नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत नव्या सरकार्यवाहांची निवड अरण्यात आली आहे. दत्तात्रय होसबोले यांची सरकार्यवाह पदी निवड करण्यात आली आहे. हे संघातील दुसरं सर्वाधिक महत्त्वाचं पद मानलं जातं. बंगळुरू येथे झालेल्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला आहे.
भैयाजी जोशी यांच्या जागी आता दत्तात्रय होसबोले यांची निवड करण्यात आली आहे. २००९ पासून सरकार्यवाह या पदावर भैय्याजी जोशी हे होते. मात्र, आता या जागी नवा चेहरा आणण्यात आला आहे. आधीपासूनच हे पद दत्तात्रय होसबोले यांच्याकडे जाईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. आता या गोष्टीवर शिक्कामोर्तब झाला आहे. हे पद महासचिवाच्या बरोबरीचं असतं. संघात सरसंघचालकांचा निर्णय अंतिम मानला जातो. सध्या मोहन भागवत संघाचे सरसंघचालक आहेत.
दर तीन वर्षांनी सरकार्यवाहांची निवड केली केली जाते. बंगळुरूमध्ये १९ आणि २० मार्च रोजी प्रतिनिधी सभा झाली.अखिल भारतीय प्रतिनिधी सभा ही संघाची निर्णय घेणारी सर्वात महत्त्वाची बैठक आहे. महत्त्वाचे सर्व निर्णय प्रतिनिधी सभेतच घेतले जातात. मागील वर्षी प्रतिनिधी सभा बंगळुरू येथे होणार होती. मात्र बदललेल्या परिस्थितीमुळे ती स्थगित करण्यात आली. त्यामुळे या वर्षी बंगळुरूमध्येच सभा घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
महत्वाच्या बातम्या
- भाडेकरू महिलेचा घरमालकाच्या १ लाख रूपयावर डल्ला
- सामाजिक बांधिलकी म्हणून रेमडेसीविर कमीतकमी दरात विका – डॉ. राजेंद्र शिंगणे
- स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणाबाबत राज्य शासनाकडून पुनर्विचार याचिका दाखल
- ‘छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याप्रकरणी मुश्रीफांनी माफी मागावी’
- गृहमंत्री अमित शहांना भाजप खासदाराचा घरचा आहेर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

