🕒 1 min read
औरंंगाबाद : गारखेडा परिसरातील उल्कानगरी येथील रहिवासी दिनेश धनाजी मोहिते (वय २२) हे काही कामानिमित्ताने बाहेरगावी गेले असता चोरट्यांनी त्यांचे घर फोडून घरातून ७५ हजार रूपये विंâमतीचे सोने-चांदीचे दागीने व रोख रक्कम चोरून नेली. ही घटना २ ते १८ मार्चच्या दरम्यान उल्कानगरी परिसरातील ज्ञानेश्वरनगर येथे घडली.
काही कामानिमित्त मोहिते हे कुटुंबीयांसोबत २ मार्च रोजी घराला कुलूप लाऊन शहराबाहेर गेले होते. त्यानंतर ते १८ मार्च रोजी उशिरा कुटुंबीयासमवेत घरी परतले. घराचा दरवाजा उघडण्यासाठी पुढे सरसावले असता. अज्ञात चोरांनी त्यांच्या घराचा दरवाजा तोडला होता. त्यानंतर त्यांनी घरातील वस्तू तपासण्यास सुरुवात केल्यावर त्यांच्या निदर्शनास आले कि, घरातील कपाटात ठेवलेले सोन्या चांदीचे दागिने नसल्याचे दिसून आले.
त्यांनी पुन्हा वस्तूंची तपासणी केल्यावर कपाटातील सुमारे ७३ हजार रुपयांचे दागिने चोरीला गेले. त्यांनी पोलीस ठाणे गाठत या प्रकरणी जवाहर नगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उपनिरीक्षक शेळके करीत आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘सांगली-जळगावातील करेक्ट कार्यक्रम ही तर नांदी, असे अनेक कार्यक्रम होतील !’
- ‘पैसे फेकले की सर्व विकत मिळते हा नवा सिद्धांत भाजपने रुजवला’
- ‘ठाकरे सरकार’ आल्यापासून लोकांच्या मनातले भय नष्ट झाल्याने लोक निर्भय बनून मतदान करीत आहेत’
- ‘सत्ता गेली की अक्कल, अक्कल गेली की भांडवल, भांडवल गेले की कुंपणावरचे कावळे उडून जातात’
- शिवसेनेला साथ देणं एमआयएम नगरसेवकांना भोवलं; पक्षाने केली हकालपट्टी


