Share

भाडेकरू महिलेचा घरमालकाच्या १ लाख रूपयावर डल्ला 

Published On: 

🕒 1 min read

औरंंगाबाद : तक्रारदार महिलेच्या घरात भाडेकरू म्हणून राहिलेल्या महिलेने घर सोडतांना तक्रारदार महिलेच्या घरातून १ लाख ८ हजार रूपये चोरून नेले. ही घटना १४ मार्चला दुपारी २ ते ४ वाजेच्या दरम्यान सिटीचौक पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. हि बाब लक्षात येता त्यांनी पोलिस ठाणे गाठले.

सात ते आठ महिन्यांपासून तक्रारदार महिलेच्या घरात एक महिला  घर काम करण्य्यासाठी आली. त्यानंतर तिला राहण्यासाठी रूम देण्यात आली, परंतु तिच्या कडे सतत अनोळखी लोक येत असल्यामुळे, तक्रारदार महिलेने तिला घर सोडण्यास सांगितले.त्यानंतर आरोपी महिलेने आठ दिवसाची मुदत मागून घेतली. तसेच ती दोन दिवसात घाईघाईने घर सोडून निघून गेली.

तक्रारदर यांना काही कारणासाठी पैसे लागत असताना हि बाब उघडकीस आली. याप्रकरणी तक्रारदार महिलेने दिलेल्या तक्रारीवरून घरातून १ लाख ८ हजार रूपये चोरून नेणा-या भाडेकरू महिलेविरूध्द सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस अंमलदार मनगटे करीत आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!