औरंंगाबाद : रस्त्याच्या मधोमध रिक्षा उभी करून वाहतूकीस अडथळा निर्माण करणा-या चार रिक्षाचालकाविरूध्द छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या चारही कारवाया १८ मार्चला करण्यात आल्या असल्याची माहिती छावणी पोलिस ठाण्याच्या सुत्रांनी दिली.
रफिक खान राशेद खान (वय ३६, रा.पत्रा कॉलनी, वाळूज), शहेबाज खान नासेर खान (रा.अशोकनगर, शहाबाजार) यांनी आपल्या रिक्षा नगरनाका चौकात मुख्य रस्त्यावर उभ्या करून वाहतूकीस अडथळा निर्माण केला होता.
तर अशोक सुखदेव नारळे (वय ५२, रा.नवयुग कॉलनी), शेख खुदबुद्दीन शेख अजीमउद्दीन (वय ४८, रा.कासंबरी दर्गाहजवळ, पडेगाव) यांनी आपल्या रिक्षा मिलिंद महाविद्यालय चौकात रस्त्यावर उभ्या करून वाहतूकीस अडथळा निर्माण केला होता. छावणी पोलिसांनी सुरु केलेल्या या कारवाई मुळे शहरातील इतर रिक्षा चालकांनी चांगलीच धास्ती घेतली असून, पोलीस आता अशा रिक्षा चालकांच्या मागावर राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘सांगली-जळगावातील करेक्ट कार्यक्रम ही तर नांदी, असे अनेक कार्यक्रम होतील !’
- ‘पैसे फेकले की सर्व विकत मिळते हा नवा सिद्धांत भाजपने रुजवला’
- ‘ठाकरे सरकार’ आल्यापासून लोकांच्या मनातले भय नष्ट झाल्याने लोक निर्भय बनून मतदान करीत आहेत’
- ‘सत्ता गेली की अक्कल, अक्कल गेली की भांडवल, भांडवल गेले की कुंपणावरचे कावळे उडून जातात’
- शिवसेनेला साथ देणं एमआयएम नगरसेवकांना भोवलं; पक्षाने केली हकालपट्टी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

