पुणे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी कोकण दौऱ्यावर आले होते. यावेळी माध्यमांशी बोलताना हेलिकॉप्टर नाही तर जमिनीवरुन पाहणी करतोय, असा टोला उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लगावला आहे.
तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी कोकणात दाखल झालेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंचनामे पूर्ण होताच मदतीसंदर्भात निर्णय घेणार असल्याचं सांगितलं आहे. यावेळी त्यांनी कोणत्या निकषानुसार मदत करायची हे आढावा घेतल्यानंतर ठरवलं जाईल असं स्पष्ट केलं.
दरम्यान, उद्धव ठाकरेंच्या या दौऱ्यावर भाजप नेत्यांनी टीकास्त्र सोडलं आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील यांनी देखील खोचक शब्दात टीकास्त्र सोडलं आहे. ‘सरकार आल्यानंतर उद्धव ठाकरे हे दीड वर्षांनी बाहेर पडले. तुमचे पाय सरकार आल्यापासून वर हवेत गेले आहेत. ते आता जमिनीवर येत आहेत, त्याबद्दल आनंद आहे,’ असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला.
फोटोसेशनसाठी आलेलो नाही, मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला !
आपण फोटोसेशन करण्यासाठी आलेलो नाही. तर, मी कोकणवासीयांना योग्य मदत देणारच. मी विरोधकांच्या टीकेला उत्तर देण्यासाठी आलेलो नाही, असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- राज्यात १ जूननंतरही लॉकडाऊन वाढणार ? मुख्यमंत्री ठाकरेंच सूचक विधान !
- ‘..म्हणून झक मारत मुख्यमंत्री ठाकरेंना कोकणात यावे लागले’, निलेश राणेंची जहरी टीका
- ‘भारत जागतिक अर्थव्यवस्थेला बळकटी देऊ शकतो’, परराष्ट्रमंत्री एस.जयशंकर यांचे मत
- कोरोना आटोक्यात कसा येणार? देशातील निम्मे लोक मास्कच वापरत नाहीत
- पंतप्रधान मोदींकडून हिवरेबाजारच्या कोरोना प्रतिबंधक कामांची दखल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
