Share

“वैचारिक मतभेद असले तरी…”; राष्ट्रवादीच्या रुपाली पाटलांनी केले मनसेच्या उमेदवाराचे अभिनंदन

Published On: 

पुणे : राज्यातील ३२ जिल्ह्यांच्या १०६ नगरपंचायतींमधील १८०२ जागा आणि जिल्हा परिषदेचा निकाल आता स्पष्ट होत आहे. सर्व पक्ष यामध्ये आपणच नंबर वन असल्याचा दावा करत आहेत. दरम्यान या निवडणुकीत महाराष्ट्र निवनिर्मान सेनेने देखील ग्रामीण विभागात आपला झेंडा फडकवला आहे. माळशिरस नगरपंचायत निवडणुकीत मनसेचा विजय झाला आहे. अत्यंत अटीतटीच्या लढाईत मनसेच्या रेश्मा टेळे या विजयी झाल्या आहेत.
 
दरम्यान, मनसेतून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (Maharashtra Navnirman Sena) प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे यांचे अभिनंदन केले आहे. रुपाली पाटील म्हणाल्या, ” बापू (दिलीप धोत्रे) अभिनंदन!, माळशिरस नगरसेवक पदी मनसेतील भगिनी रेश्मा सुरेश टेळे विजयी झाल्या त्यांचे अभिनंदन. वैचारिक मतभेद असले तरी आपल्या राजकीय संकटात पाठीशी उभा राहणाऱ्या ‘बापूला’ आज शुभेच्छा!, खडकावर बाग फुलवण्याची महत्वाकांक्षा ठेवणारा दिलदार भाऊ त्याच्या संघर्षाला व संघर्षाच्या शिलेदारास शुभेच्छा.”
 
रुपाली पाटील ठोंबरे यांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते एक महिन्यापुर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश झाला होता. रुपाली पाटील यांना मनसे सोडल्याने काही मनसैनिकांनी टीका केली तर काहींनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या होत्या. तसेच राष्ट्रवादीच्या अनेक बड्या नेत्यांनी रुपाली पाटील ठोंबरे यांचे पक्षात मोठ्या आनंदाने स्वागत केले होते.
महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!