Share

अपहरण झालेला स्वर्णव नेमका सापडला कसा? वाचा सविस्तर

Published On: 

पुणे: पुण्यातील बालेवाडीतून अपहरण झालेला स्वर्णव चव्हाण हा चार वर्षीय मुलगा अखेऱ आज दुपारी साधारण अडीच वाजेच्या सुमारास सापडला. पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (Amitabh Gupta) यांनी देखील याबाबत माहिती दिली आहे. पुण्यातील डॉ. सतीश चव्हाण (Dr. Satish Chavan) यांच्या स्वर्णव (डुग्गु) या चार वर्षीय मुलाचं बालेवाडीमधून आठवडाभरापूर्वी अपहरण झालं होतं.

स्वर्णवचा जवळपास ३०० पेक्षा अधिक पोलीस कर्मचारी आणि अधिकरी सर्वत्र शोध घेत होते. अखेर आज दुपारच्या सुमारास वाकड जवळील पुनावळे येथे स्वर्णव सापडला. मात्र त्याचं अपहरण कोणी आणि का केलं, याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही. आता उत्सुकता लागली आहे की नेमका स्वर्णव सापडला कसा आणि घरापर्यंत तो कसा पोहोचला.

बुधवारी दुपारी अपहरण झालेल्या या चिमुरड्याला पूनावळे येथे आरोपी व्यक्तीने सोडून दिलं होतं. पोलिसांना त्याबाबतची माहिती मिळताच त्यांनी मुलाला ताब्यात घेउन त्याच्या पालकांकडे सुपुर्द केलंय. मुलगा सुखरूप असून त्याला कोणत्याही प्रकारे जखम झाली नसल्याचंही पोलिसांनी सांगितलंय.

सुरक्षारक्षक दादाराव जाधव यांच्याजवळ स्वर्णवला सोडण्यात आलं होतं. आरोपीने स्वर्णव ऊर्फ डूग्गू याला त्यांच्याकडे सोपवलं आणि तिथून पळ काढला. दादाराव जाधव यांनी मुलाच्या बॅगवरील नंबरवर फोन करून याबाबतची पोलीसांना माहिती दिली आणि त्यानंतर स्वर्णव आपल्या घरी सुखरुप पोहोचला.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!