Share

Lata Mangeshkar : ‘हेमा’ची झाली ‘लता’, जाणून घ्या लतादीदींच्या आयुष्यातील कहानी

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : सुरेल आवाजाची देणगी लाभलेल्या, विश्वविख्यात, प्रतिभावंत गायिका लता दीनानाथ मंगेशकर (lata mangeshkar) यांनी आज (६ फेब्रुवारी) अखेरचा श्वास घेतला. भारतीय चित्रपट-संगीतातील युगप्रवर्तक व सर्वश्रेष्ठ पार्श्वगायिका म्हणून त्या सर्वपरिचित आहेत. त्यांचा जन्म २८ सप्टेंबर १९२९ इंदूर येथे झाला. मराठी रंग भूमीवरील तेजस्वी गायकनट मास्टर दीनानाथ ह्यांच्या त्या ज्येष्ठ कन्या होत. दीनानाथांच्या गायनकलेचा वारसा त्यांना लाभला. वडिलांच्या ‘बलवंत संगीत नाटक मंडळी’ च्या रंगमंचावर बालवयात त्या छोट्या संगीत भूमिकाही केल्या.

लता मंगेशकरांचे कुटुंब संगीतासाठी प्रसिद्ध असून, सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले, उषा मंगेशकर, मीना मंगेशकर आणि ख्यातनाम संगीतकार-गायक हृदयनाथ मंगेशकर ही त्यांची सख्खी भावंडे आहेत. लता मंगेशकरांचे वडील मास्टर दीनानाथ मंगेशकर हे मराठी नाट्य-संगीताचे प्रसिद्ध गायक होते.

हेमाची झाली ‘लता’

लता मंगेशकर यांच्या वडिल दीनानाथ मंगेशकर यांच्या निधननानंतर सर्व जबाबदारी लता यांनी पेलवली. त्यांनी भावंडासाठी आई-वडिल दोन्हींची भूमिका अत्यंत प्रेमळपणे सांभाळली. लता जेव्हां चार-पाच वर्षांची होती, तेव्हाच त्यांच्या वडिलांना त्यांच्यातील गाण्यातील रूची ओळखलं होतं. बाळाचे पाय पाळण्यात म्हणतात ना.. तसंच लताजींना आवाजाची देणगी मिळाल्यानं त्याचं त्यांनी सोनं केलं.

जीवनातील माहिती

हेमा नाव होतं मात्र त्यानंतर त्यांच नाव लता कसं पडलं तर..पं.दीनानाथ यांचे लग्न नर्मदा यांच्या झाले होते, त्यांना एक मुलगी झाली तिचं नाव लतिका ठेवण्यात आलं. मात्र कमी वयात तिचा मृत्यू झाला, त्यानंतर नर्मदाचा ही मृत्यू झाला. काही काळानंतर पं. दीनानाथ यांनी नर्मदाची लहान बहिण शेवंताशी लग्न केलं. या दोघांना या लग्नानंतर पाच मुलं झालं हेमा (लता), मीना, आशा उषा ह्रदयनाथ. मात्र त्यानंतर हेमा नाव असून त्यांना त्यांच्या पहिल्या मुलींच नाव म्हणजे लता याच नावाने हाक मारल्या गेल्या. त्यानंतर त्यांचं नाव लता हेच ठरलं.

तसेच त्यांचे वडिल संगीतासह ज्योतिषविद्या जाणत होते. त्यांनी एक दिवस लता मंगेशकर यांना एक गोष्ट सांगितली की, “भविष्यात तू खूप प्रसिध्द होशील, ऐशोआराम मिळेल तसेच तुझा मुकाबला कोणीच करू शकणार नाही. तुझं नाव मोठं होईल, कुटुंबाची जबाबदारी पण तुझ्यावर येईल. तसेच तुझा विवाह होणार नाही, तू आयुष्यभर अविवाहित राहशील”. त्यांनी सांगितलेल्या गोष्टी त्याकाळी न पटणाऱ्या होत्या. मात्र आज त्या सर्व गोष्टी खऱ्या ठरल्या.

लतादीदींना भारतरत्न या देशातील सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. याशिवाय त्या दादासाहेब फाळके पुरस्कार आणि फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ऑफिसर ऑफ द लीजन ऑफ ऑनर यासह अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित झाल्या आहेत. १९७४ मध्ये, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने त्यांना इतिहासातील सर्वाधिक रेकॉर्डिंग केलेल्या कलाकार म्हणून स्थान दिले. त्यांनी १९४८ ते १९७४ या काळात २५००० हून अधिक गाणी गायली आहेत.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!