🕒 1 min read
मुंबई : महाराष्ट्रासह देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर माजवला आहे. देशात दररोज विक्रमी कोरोनाबाधितांची नोंद होत असून अयोग्य सेवेवर प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. राज्यात देखील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे इतर राज्यांपेक्षा अधिक गंभीर परिणाम दिसून आले असून अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
महाराष्ट्रात अशी भीषण परिस्थिती असतानाच आता राज्यावर म्युकरमायकोसीस या नव्या आजाराने हात पसरायला सुरुवात केली आहे. म्यूकरमायकोसिस हा आजार अनेक रुग्णांना होत असल्याचे समोर आले आहे. राज्यात म्यूकरमायकोसिसची लागण झाल्याचे २ हजार रुग्ण आढळून आले आहेत. म्यूकरमायकोसिस हा बुरशीजन्य आजार असून, या आजारासाठीचे १४ इंजेक्शन घ्यावे लागतात. या इंजेक्शनचे दर महाग असल्यामुळे गोरगरीब नागरिकांच्या आवाक्याबाहेर खर्च जात आहे. त्यामुळे या आजारावरील उपचार जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून करण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती सध्या मिळत आहे.
म्युकोरमायकोसिस आजाराचा राज्यभरात वेगाने फैलाव होत असल्यामुळे आता ठाकरे सरकार कमालीचे सावध झाले आहे. हा आजार दुर्मिळ असल्याने राज्यात आतापासूनच त्यावरील औषधांचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे ठाकरे सरकारने मुंबईच्या हाफकिन इन्स्टिट्यूटला म्युकोरमायकोसिसच्या उपचारासाठी वापरण्यात येणाऱ्या 1 लाख इंजेक्शन्सची ऑर्डर दिली आहे. असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मंगळवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे.
काय आहे हा आजार? :
म्यूकरमायकोसिस हा बुरशीमुळे होणारा आजार असून, बुरशी हवेतून पसरते. त्याचा संसर्ग झाल्यास नाकाभोवती असलेल्या मोकळ्या जागेत बुरशी साठून राहते. कोरोनाबाधित रुग्णांना ऑक्सिजन दिला जातो. तेव्हा त्या ऑक्सिजनमधील पाणी शुध्द असले पाहिजे. पाणी शुद्ध नसल्यास हा बुरशीजन्य आजार म्हणजेच म्युकरमायकोसिसची लागण होते. अशा व्यक्तींत नाकातून रक्त येणे, चेहरा एका बाजूने दुखणे, मेंदूत संसर्ग झाल्यास तीव्र डोकेदुखी, छातीत दुखणे, डोळ्यांना त्रास होणे, एकच दृश्य दोनदा दिसणे आदी प्रकारची लक्षणे आढळून येतात. कोव्हिडच्या आजारातून बरे झालेल्यांपैकी काहींना ही लक्षणे दिसल्याने उपचार करावे लागल्याचे डॉक्टरांनी मुंबई, दिल्ली आदी ठिकाणच्या डॉक्टरांनी सांगितले आहे. बुरशीचा संसर्ग मोठ्या प्रमाणात असल्यास शस्त्रक्रिया करावी लागते.
महत्वाच्या बातम्या
- युवकाला टोळीने लुटले, पळून जाणाऱ्या टोळीला पोलिसांनी सिनेस्टाईलने पकडले
- नवाब मलिक जरा कमी बोलले तर अडचणी कमी होतील, दरेकरांचा टोला
- एबी डिव्हीलीयर्स नंतर ‘हा’ दिग्गज खेळाडूही टी-२० विश्वचषकात करु शकतो पुनरागमन
- ‘नद्यांमध्ये वाहणारे असंख्य मृतदेह, मोदीजी तो गुलाबी चष्मा आतातरी काढा’
- ‘या’ तालुक्यात सर्वात कमी लसीकरण; मृत्युदरही जास्त!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

