🕒 1 min read
मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या अडचणीत आता वाढ झाली असून ईडीने त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्यानंतर आता पैशाची अफरातफर केल्याचा आरोप करत ईडीकडूनही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
देशमुख यांच्या चौकशीनंतर सीबीआयने गुन्हा दाखल केला. हा गुन्हा दिल्लीत दाखल करण्यात आला असून देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप लावण्यात आला. आता या प्रकरणात ED ने सुद्धा एन्ट्री केलीय. ईडीडून अनिल देशमुख यांच्या विरोधात मनी लॉन्डरिंग प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे लवकरच अनिल देशमुख यांची ईडी मार्फत देखील चौकशी होण्याची शक्यता आहे.
दरम्यान,या सर्व घडामोडी घडत असताना आता राजकीय आरोप-प्रत्यारोप देखील होऊ लागले आहेत. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर ईडीने गुन्हा दाखल केला हे सगळं राजकीय हेतूने आणि सत्तेचा वापर करून त्यांना बदनाम करण्यासाठी कारस्थान सुरू आहे अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी यांनी व्यक्त केलीय.
माजी गृहमंत्री @AnilDeshmukhNCP यांच्यावर ईडीने गुन्हा दाखल केल्याचे वृत्त आहे. राजकीय हेतूने व सत्तेचा वापर करून त्यांना बदनाम करण्यासाठी हे कारस्थान सुरू आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री ना. @nawabmalikncp यांनी दिली आहे. pic.twitter.com/Bp9nsWDEM4
— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) May 11, 2021
त्यानंतर विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी नवाब मलिकांना टोला लगावलाय. ‘केवळ केंद्र सरकारला टार्गेट करून आणि दुसऱ्या राज्यांतील स्वतःच्या सोयीची असलेली उदाहरणे देऊन राजकारण करण्याचा प्रयत्न मंत्री नवाब मलिक करतात. त्यामुळे ते जरा कमी बोलले तर अडचणी कमी होतील’. असं दरेकर म्हणाले आहेत.
केवळ केंद्र सरकारला टार्गेट करून आणि दुसऱ्या राज्यांतील स्वतःच्या सोयीची असलेली उदाहरणे देऊन राजकारण करण्याचा प्रयत्न मंत्री नवाब मलिक करतात. त्यामुळे ते जरा कमी बोलले तर अडचणी कमी होतील.@BJP4Maharashtra pic.twitter.com/207HtQT4a2
— Pravin Darekar – प्रविण दरेकर (@mipravindarekar) May 11, 2021
महत्वाच्या बातम्या
- ‘या’ तालुक्यात सर्वात कमी लसीकरण; मृत्युदरही जास्त!
- आता न्यायपालिकेवर विश्वास नाही, जनता हेच सर्वात मोठं न्यायालय; मराठा क्रांती ठोक मोर्चा आक्रमक
- ‘या’ महान गोलंदाजाला आवडते हॉलिवूड अभिनेत्री ; मैत्री वाढवण्याच्या आहे प्रयत्नात
- जालन्यातील लोधी मोहल्ला भागात तुफान दगडफेक; दोन पोलीस कर्मचारी जखमी
- महाराष्ट्रात म्युकरमायकोसीसचे २ हजार बाधित रुग्ण तर ८ जणांचा मृत्यू : आरोग्यमंत्री
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

