Share

‘या’ तालुक्यात सर्वात कमी लसीकरण; मृत्युदरही जास्त!

Published On: 

उस्मानाबाद: जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने येथील परिस्थिती चिंताजनक झाली आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी अनेक उपाययोजना करण्यात येत असल्या तरी त्याचा हवा तेवढा फायदा होत नसल्याचे दिसत आहे. तसेच जिल्ह्यातील उमरगा तालुक्यात सर्वात कमी लसीकरण झाले असल्याचे समोर आले आहे. तसेच या तालुक्यातील मृत्युदर देखील जास्त असल्याचे समोर आले आहे.

तालुक्यात कोरोना संसर्ग दिवसेंदिवस वाढत चालला असून मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ५८५ जण पॉझिटिव्ह आले असून ७४ जणांचा मृत्यू झाला आहे. दहा महिन्यात ४९४६ पॉझिटिव्ह तर २५९ जणांचा मृत्यू झाला असून सर्वाधिक मृत्यू हे शासकीय रुग्णालयात झाले आहेत. अशा भीषण संकटात नागरिकांना प्रामुख्याने कोवॅक्सिन व कोविशील्ड या दोन लसी दिल्या जात आहेत. आतापर्यंत कोवीशील्डचा पहिला डोस ३१०९ नागरीकांना देण्यात आला तर १६४५ जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे. २४५८ नागरीकांना कोवॅक्सिनचा पहिला डोस मिळाला असुन दुसरा डोस केवळ ३४० नागरिकांना देण्यात आला आहे.

तालुक्यातील दोन लाख ६६ हजार ४६ लोकसंखेनुसार केवळ १९ हजार ८६४ नागरिकांचे लसीकरण झालेले असून सदरील टक्केवारी पाहता आठ टक्के नागरिकांचे लसीकरण झाल्याचे स्पष्ट होते. उर्वरित ९२ टक्के नागरिकांचे लसीकरण करणे गरजेचे आहे. याला आणखीन किती वेळ लागले, याची माहिती नाही. कोवॅक्सिनचा पहिला डोस तालुक्यातील बऱ्याच ज्येष्ठ नागरिकांना आणि प्रशासनात कार्यरत कर्मचाऱ्यांना देण्यात आला आहे. कोवॅक्सिनचा पहिला डोस घेतलेल्या नागरिकांना आज दीड ते दोन महिन्यापेक्षा जास्त कालावधी होत आला आहे.

२८ तारखेपासून तालुक्यामध्ये कोवॅक्सिन ही लस उपलब्ध नाही. लसीकरणासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती अभियान राबवले जात आहे. नागरिक लस घेण्यासाठी प्रवृत्त होत असले तरी जिल्ह्यात प्रशासकीय यंत्रणेकडे लस उपलब्ध नसल्याने प्रशासकीय यंत्रणा आणि नागरिक संभ्रमात आहेत. अनेकांनी लसीचा पहिला डोस घेतला असताना दुसऱ्या डोसचा कालावधी संपत आल्याने उशिरा लसीकरण झाल्यास ती प्रभावी ठरेल किंवा नाही असा संभ्रम लाभार्थ्यांमध्ये निर्माण झाला आहे. ९२ टक्के एवढ्या मोठ्या लोकसंख्येला लसीकरण करण्यासाठी लागणारा कालावधी पाहता प्रशासकीय यंत्रणेवर मोठा ताण राहणार आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!