🕒 1 min read
नवी दिल्ली : कोरोना रुग्ण संख्येच्या वाढीबाबत भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाचा देश ठरला आहे. सध्या भारतात सर्वाधिक कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. देशात दररोज विक्रमी कोरोनाबाधितांची नोंद होत असून आरोग्य सेवेवर प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. राज्यात देखील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे इतर राज्यांपेक्षा अधिक गंभीर परिणाम दिसून आले असून अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
अशातच, रुग्णालयात बेड्स, ऑक्सिजन, रेमडेसीवीर, अपुरी आरोग्य यंत्रणा, डॉक्टरांची कमतरता व इतर औषधांचा तुटवडा निर्माण झाल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना मनस्ताप सहन करावा लागला असून व्यवस्थेविरोधात नागरिकांमध्ये चीड निर्माण होत आहे. त्यामुळे भारतातील आरोग्य यंत्रणा कमी पडत आहे. अशा परिस्थितीत भारताच्या मदतीसाठी अनेक देश धावले आहेत. अनेक देशांमधून आरोग्य साहित्य भारताला मिळत आहे.
देशातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांवर अंतिम संस्कार करण्यासाठी जागा मिळत नाही. बिहार, उत्तर प्रदेश मधून धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. बिहारमधील बक्सममध्ये गंगेच्या किनारी मृतदेह वाहून आले आहेत. प्रशासनाने हे मृतदेह उत्तर प्रदेश येथून वाहून आले असल्याची शक्यता वर्तवली आहे. याच मुद्यावरून आज राहुल गांधी यांनी कॉंग्रेल नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे.
नदियों में बहते अनगिनत शव
अस्पतालों में लाइनें मीलों तक
जीवन सुरक्षा का छीना हक़!PM, वो गुलाबी चश्में उतारो जिससे सेंट्रल विस्टा के सिवा कुछ दिखता ही नहीं।
— Rahul Gandhi (@RahulGandhi) May 11, 2021
राहुल गांधी म्हणाले, ‘नद्यांमध्ये वाहणारे असंख्य मृतदेह, रुग्णांच्या रूग्णालया बाहेर मैलांपर्यंत लागलेल्या रांगा, जीवन सुरक्षेचा हक्कच हिरावून घेतला आहे. पंतप्रधान, तो गुलाबी चष्मा उतरवा ज्यातून सेंट्रल विस्टाशिवाय काहीच दिसत नाही,’ असं म्हणत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- आता न्यायपालिकेवर विश्वास नाही, जनता हेच सर्वात मोठं न्यायालय; मराठा क्रांती ठोक मोर्चा आक्रमक
- १८-४४ वर्षांवरील लसीकरणाचा वेग मंदावणार ; जेष्ठांना प्राधान्य
- कोरोनाच्या नियमांना पायदळी तुडवत मुस्लिम धर्मगुरुच्या अंत्ययात्रेसाठी जमली तुफान गर्दी
- महाराष्ट्रात म्युकरमायकोसीसचे २ हजार बाधित रुग्ण तर ८ जणांचा मृत्यू : आरोग्यमंत्री
- ही कोरोनाची तिसरी लाट तर नाही ना ?, ठाकरे सरकारमधील मंत्र्याला संशय…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

