नवी दिल्ली : बिहारमध्ये लोक जनशक्ती पक्षात सुरु असलेल्या अंतर्गत युद्धादरम्यान पक्षाचे नेते चिराग पासवान यांनी बुधवारी एका पत्रकार परिषदेत आपल्या भावना व्यक्त केल्या. काही काळापासून माझी प्रकृती ठिक नव्हती. जे काही झालं ते माझ्यासाठी योग्य नाही. आजही औषधं घेऊन मी इथे दाखल झालो आहे, असं चिराग पासवान यांनी पत्रकारांसमोर म्हटलं.
कुटुंबातील गोष्टी बाहेर पडू नयेत. बंद दाराआड सर्व मुद्द्यांचा निपटारा व्हावा, असे वाटत होते. गेल्या काही दिवासांपासून माझी तब्येत बरी नव्हती. मी जास्त घराबाहेर पडू शकलो नाही. माझ्या आजारपणाचा गैरफायदा घेत कट रचण्यात आल्याचा आरोप चिराग पासवान यांनी केला आहे. काकांनी इच्छा व्यक्त केली असती, तर त्यांना संसदीय दलाचे नेते केले असते, असेही चिराग यांनी स्पष्ट केले.
दुख मुझे इस बात का है कि जब मैं बीमार था, उस समय मेरे पीठ पीछे जिस तरह से ये पूरा षड्यंत्र रचा गया। मैंने चुनाव के बाद अपने चाचा से संपर्क करने का, उनसे बात करने का निरंतर प्रयास किया: चिराग पासवान https://t.co/ttjqoDmvon
— ANI_HindiNews (@AHindinews) June 16, 2021
विधानसभा निवडणुकीतही काकांचे असहकार्य
जेव्हा रामविलास पासवान रुग्णालयात असतानाच पक्षाला तोडण्यात येण्याची कुणकुण समोर आली होती. पक्षात काही जणांना संघर्ष करण्याची इच्छा नाही. बिहारमध्ये आम्ही विधानसभा निवडणुका नितीश कुमार यांच्यासोबत लढलो असतो तर बहुमत मिळालं असतं परंतु, मला मात्र नतमस्तक व्हावं लागलं असतं. विधानसभा निवडणुकीतही मला काका पशुपती कुमार पारस यांच्यासहीत अनेकांचं सहकार्य मिळालं नव्हतं, अशी खंत यावेळी चिराग पासवान यांनी व्यक्त केली.
मी घाबरणार नाही
दरम्यान, मी रामविलास पासवान यांचा मुलगा आहे. मी आधी कधी घाबरलो नाही, आताही घाबरणार नाही. जनतेचा आम्हाला पाठिंबा आहे. जनता दल युनायटेडकडून आमच्यात फूट पाडण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा दावा चिराग पासवान यांनी यावेळी बोलताना केला.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘मोदी सरकारने मर्जीनेच दोन लसींच्या डोसमधील अंतर वाढवले’, राहुल गांधींचा गंभीर आरोप
- ‘चेहरा भोळा अन् भानगडी सोळा’ ; भाजपाची ठाकरे सरकारवर जहरी टीका
- ‘डिस्को डान्सर’ मिथुन चक्रवर्ती यांचे ७१व्या वर्षात पदार्पण
- मोठी बातमी : मूक आंदोलनातील लोकप्रतिनिधींच्या भाषणबाजीवर मराठा क्रांती मोर्चा नाराज !
- कोरोना नियमांवरून राष्ट्रवादीच्या कार्यक्रमातच मंत्री शिंगणेंकडून कार्यकर्त्यांना कानपिचक्या
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

