🕒 1 min read
मुंबई : विधानसभा तालिका अध्यक्षांना धक्काबुक्की केल्या प्रकरणी भाजपच्या आमदारांचं निलंबन करण्यात आलं आहे. गैरवर्तन करणाऱ्या आमदारांचं एक वर्षासाठी निलंबन करण्यात आलं आहे. अभिमन्यू पवार, आशिष शेलार, अतुल भातखळकर, जयकुमार रावल, राम सातपुते, गिरीश महाजन, संजय कुटे, नारायण तिलकचंद, पराग आळवणी, हरिष पिंपळे, नारायण कुचे, बंटी भांगडीया यांचं निलंबन करण्यात आलं आहे. विधानसभा अध्यक्षांच्या या कारवाईनंतर भाजपने बहिष्कार टाकला आहे.
संसदीय कार्यमंत्री अनिल परब यांनी भाजपच्या १२ आमदारांवर कारवाई म्हणून १ वर्षासाठी निलंबित करण्याचा ठराव मांडला होता. हा ठराव आवाजी मतदानाने सभागृहात मंजूर करण्यात आला आहे. यानंतर आता भाजपने महाविकास आघडीवर टीकास्त्र डागायला सुरुवात केली आहे. भाजपचे नेते सातपुते यांनी आता या सर्व गोंधळावर भाष्य केले आहे.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या प्रतिक्रेयेत ते म्हणाले कि, ‘मी सकाळी विद्यार्थ्यांसाठी आंदोलन केले होते, तसेच ओबीसी समाजाच्या संबंधित ठराव सभागृहात मांडण्यात आला होता त्यावेळी विरोधी पक्ष म्हणून आम्ही घोषणा देत होते. माझा आवाज मोठा आहे त्यामुळे मी घोषणा दिल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सत्ताधार्यांच्या कानठाळ्या बसल्या असाव्यात त्यामुळे मला निलंबित केले आहे.
परंतु निलंबित करून ते आमचा आवाज दाबू शकत नाहीत. खोट्या स्टोऱ्या बनवून आम्हाला निलंबीत केले आहे. आगामी काळात रस्त्यावर उतरून या सरकारचा पर्दाफाश करू, तसेच वेळ पडलीच तर ओबीसी समाजासाठी आमदारकी पणाला लावू’ असे भाष्य त्यांनी येवेली केले आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘फडणवीसांच्या नेतृत्त्वाखाली शिवीगाळ, धक्काबुक्की झाली’, नवाब मलिकांचा आरोप
- ‘हिंदू-मुस्लिम वेगवेगळे नाहीत, सर्वांचा डीएनए एकच’, मोहन भागवत यांचे वक्तव्य
- ‘मराठा समाजाच्या प्रश्नांवर वादविवाद नकाे’, संभाजीराजेंचे आवाहन
- ‘इम्पेरिकल डेटा केवळ राज्य सरकार गोळा करू शकते, ठराव फक्त दिशाभूल करण्यासाठी’
- ओबीसी आरक्षणासाठी केंद्राने इम्पेरिकल डेटा देण्यासाठीचा ठराव विधानसभेत मंजूर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
