नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी ७ मे रोजी सहकुटुंब अयोध्या दौरा केला. चार दिवसांच्या तीर्थयात्रेसाठी गेलेल्या आमदार रोहित पवार यांनी अयोध्येत रामलल्लाचं दर्शन घेतलं. आयोध्यासोबतच वाराणसी, अजमेर, सारनाथला देखील ते गेले होते. यावर आता रोहित पवारांनी माध्यमांशी संवाद केला.
आयोध्यासोबतच वाराणसी, अजमेर, सारनाथला देखील गेलो होतो. तिथे जाऊन गंगाची पुजा केली. मी तिथे माझ्या कुटुंबासोबत गेलो होतो. भारतातील सर्वच जण आपल्या कुटुंबासोबत यात्रेला जातात, तसाच मी सुध्दा जाऊन आलो. देशात आणि महाराष्ट्रात शांतता निर्माण व्हावी, अशी मी प्रार्थना केली. भारतातील कोणतीही व्यक्ती ज्या प्रकारे आपल्या कुटुंबासोबत बाहेर मंदिरात जातो. त्याच प्रकारे मी आयोध्याला गेलो होतो, असे रोहित पवार म्हणाले.
दरम्यान मतदारसंघातील कार्यकर्ते आणि अधिकाऱ्यांवर रोहित पवारांकडून दबावतंत्र सुरु असल्याचा आरोप सुजय विखे पाटील यांनी केला. रोहित पवार यांनी या आरोपावर स्पष्टीकरण दिले आहे, माझा मतदारसंघातील असणाऱ्या अधिकाऱ्यांवर दबाव नक्की आहे. दबाव ह्याच्यासाठी आहे की सामान्य लोकांची काम करत असताना ते काम मनापासून करावं लागेल. लोकांच्या हितासाठी जर लोकांमध्ये जाऊन मी काम करतो तर ते अधिकाऱ्यांनी पण केलं पाहिजे, म्हणून अधिकाऱ्यांमध्ये आणि माझ्या मध्ये समन्वय राखण्याच काम माझे पीए करतात.
महत्वाच्या बातम्या –


