🕒 1 min read
नवी दिल्ली: काश्मिरी पंडितांच्या मुद्द्यावरून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी वक्तव्य केले होते. या पार्श्वभूमीवर त्यांच्या निवासस्थानासमोर काल निदर्शने करण्यात आली. या प्रकरणी भाजप नेते तेजस्वी सूर्या यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तेजस्वी सूर्या आणि तेजिंदर पाल सिंग बग्गा यांच्यासह भाजप कार्यकर्ते आंदोलन करण्यासाठी तेथे पोहोचले होते. यावरच आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“काल माझ्या घरावर हल्ला झाला. पण माझा जीवही देशासाठी हजर आहे. मी महत्त्वाचा नाही तर देश महत्त्वाचा आहे.पण अशा प्रकारची गुंडगिरी योग्य नाही. अशा प्रकारे देशाची प्रगती होईल का? नाही. .. आपण सर्वांनी मिळून देशासाठी काम करायला हवे. गेली ७५ वर्ष यातच गेली. भांडण, द्वेष मात्र आता सर्वांनी प्रेमाने एकतेने राहायला हवे.”, असे केजरीवाल यांनी म्हटले आहे.
या हल्ल्यानंतर दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Delhi Deputy Chief Minister Manish Sisodia) यांनीही प्रतिक्रिया देत म्हटले होते की, “भाजपला केजरीवाल यांना मारायचे आहे. भारतीय जनता पक्षाच्या गुंडांना पोलिसांसह मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरी नेण्यात आले. त्यांच्या घरातील सीसीटीव्ही कॅमेरे तोडले. बूम बैरियर तोडून सर्व काही पोलिसांच्या उपस्थितीत घडले. हे सर्व भाजपच्या गुंडांनी केले आहे. भाजप अरविंद केजरीवाल यांना निवडणुकीत हरवू शकत नाही, म्हणून भाजप त्यांची हत्या करण्याचा प्रयत्न करत आहे. ही अतिशय विचारपूर्वक केलेली योजना आहे.”
महत्वाच्या बातम्या:
मिथिला पालकरवर दुःखाचा डोंगर; तिच्या सर्वात जवळच्या व्यक्तीचं निधन
IPL 2022: दिल्लीच्या खेळाडूने दाखवला कॅप्टन ऋषभवर विश्वास; म्हणाला ‘तो यंदा पहिले जेतेपद मिळवेल…’
खताचे संकट टाळण्यासाठी कृषी विभागाचा पुढाकार!
IPL 2022 : गुणतालिकेत कोण कुठल्या स्थानी?, पर्पल-ऑरेंज कॅप कुणाकडं? वाचा सर्व एका क्लिकवर!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
