Share

IPL 2022: दिल्लीच्या खेळाडूने दाखवला कॅप्टन ऋषभवर विश्वास; म्हणाला ‘तो यंदा पहिले जेतेपद मिळवेल…’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: दिल्ली कॅपिटल्सचा वेगवान गोलंदाज खलील अहमदने कर्णधार ऋषभ पंतबाबत मोठे वक्तव्य केले आहे. आयपीएलच्या दुसऱ्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने मुंबईचा पराभव करत विजयाने सुरुवात केली. आता सगळ्यांच्या नजर दिल्लीवर असणार आहेत. कारण गेल्या तीन हंगामात दिल्ली कॅपिटल्सचा संघ प्लेऑफसाठी पात्र ठरला आहे. त्यामुळे ते यंदाच्या आयपीएल २०२२ चे विजेतेपद पटकावण्याचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. ज्यावर वेगवान गोलंदाज खलील अहमदने आपली मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

वेगवान गोलंदाज खलील अहमद (Khaleel ahmed) गेल्या चार मोसमात हैदराबाद (SRH) संघाकडून खेळला. यंदा खलील दिल्ली कॅपिटल्स (DC) संघाकडून खेळत आहे. दिल्ली कॅपिटल्सने त्याला ५.२५ कोटींची बोली लावून विकत घेतले होते. २०१६च्या अंडर-१९ वर्ल्ड कपमध्ये खलील ऋषभ पंतच्या टीमचा भाग होता. हे दोन खेळाडू एकत्र खेळले आहेत. त्यामुळे खलील अहमदला ऋषभ पंतची (Rishabh pant) विचारसरणी चांगलीच ठाऊक आहे आणि त्याचे त्याच्याशी चांगले संबंध आहेत. त्यामुळे ऋषभ दिल्लीला पहिले जेतेपद मिळवून देऊ शकतो असा विश्वास खलीलला आहे.

ऋषभबाबत सांगताना खलील म्हणाला, “मला खात्री आहे की दिल्ली कॅपिटल्स यावेळी त्यांचे पहिले विजेतेपद जिंकेल. ऋषभ हा प्रतिभावान कर्णधार आहे आणि तो दिल्लीसाठी चांगली कामगिरी करत आहे. मला खात्री आहे की ऋषभ दिल्लीला पहिले विजेतेपद मिळवून देईल.” दिल्लीने त्यांच्या पहिल्याच सामन्यात मुंबईला ४ विकेट्सने पराभूत केले आहे.

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!