Share

खताचे संकट टाळण्यासाठी कृषी विभागाचा पुढाकार!

Published On: 

🕒 1 min read

लातूर : भारतामध्ये सर्वाधिक खताचा पुरवठा हा रशियामधून केला जातो. मात्र, यंदा युध्दाच्या परस्थितीमुळे खताची आणि कच्च्या मालाची आवकच झालेली नाही. खरीप हंगामाच्या 1 महिनापूर्वीच खताची आयात होत असते. पण अद्यापपर्यंत ती प्रक्रियाच पूर्णच झालेली नाही. आता यासाठी कृषी विभाग प्रयत्न करणार आहे.

सध्या बाजारपेठेत असलेली खते शेतकऱ्यांनी आताच खरेदी करुन ठेवणे गरजेची आहेत. जून व जुलैमधील मंजूर आवंटन एप्रिल व मे महिन्यात प्राप्त करुन घेण्याचा प्रयत्न कृषी विभाग करणार आहे. डीएपी खताचा साठा विक्रत्यांकडे असेल तर तात्काळ त्याची विक्री करावी लागणार आहे. याला पर्याय म्हणून 3 बॅग सिंगल सुपर फॉस्फेट व 20 किलो युरिया वापरासाठी जनजागृती महत्वाची राहणार आहे.

सध्याच्या प्रतिकूल परस्थितीमध्येही शेतकऱ्यांचे हित जोपासण्यावर कृषी विभागाचा भर राहणार आहे. दरवर्षी बोगस खतातून शेतकऱ्यांची फसवणूक होते. यासाठी जिल्हा निहाय पथके नेमण्यात येणार आहेत. आहे तो साठा शेतकऱ्यांपर्यंत पोहचावा आणि शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये ही जबाबदारी पथकांची राहणार आहे. बनावट खते, बियाणे आढळून आल्यास विक्रेत्यांवर थेट कारवाई केली जाणार आहे.

महत्वाच्या बातम्या –

“मला काहीच सांगायचं नाही, नो कमेंट” – अजित पवार
IPL 2022 : अरेरे…काय हे! RCBचा कप्तान फाफ डु प्लेसिसने घेतला सर्वात वाईट रिव्ह्यू; पाहा VIDEO
VIDEO: अन एकाच क्रीज वर दोन्ही खेळाडू तरी कोणीही झाला नाही रन आऊट; बघा IPL 2022 मधील मजेशीर घटना
“मी बाळाला जन्म देण्यासाठी उत्सुक आहे..” समंथा रुथ प्रभू 
राहुल गांधींनी बाईकला हार घालत केला इंधन दरवाढीचा निषेध; दिल्लीत काँग्रेसची निदर्शने

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!