Share

IPL 2022 : गुणतालिकेत कोण कुठल्या स्थानी?, पर्पल-ऑरेंज कॅप कुणाकडं? वाचा सर्व एका क्लिकवर!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आयपीएल २०२२च्या सहाव्या सामन्यात श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील कोलकाता नाइट रायडर्सचा ३ गडी राखून पराभव करून चालू हंगामातील पहिला विजय नोंदवला. यापूर्वी पंजाबविरुद्ध २००हून अधिक धावा करूनही आरसीबीला पहिल्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. केकेआरचा हा दोन सामन्यातील पहिला पराभव आहे. आरसीबीच्या वतीने फिरकीपटू वानिंदू हसरंगाने केकेआरच्या ४ फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. हसरंगाच्या शानदार गोलंदाजीसाठी त्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.

आयपीएलच्या गुणतालिकेत ६ संघांचे समान २-२ गुण आहेत. मात्र निव्वळ धावगतीच्या आधारावर संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील राजस्थान रॉयल्सचा संघ अव्वल स्थानावर आहे. दिल्ली कॅपिटल्स दुसऱ्या तर पंजाब किंग्ज तिसऱ्या स्थानावर आहेत. गुजरात टायटन्स चौथ्या क्रमांकावर, तर कोलकाता नाइट रायडर्स पाचव्या क्रमांकावर आहे आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू सहाव्या क्रमांकावर आहे.

आयपीएलच्या १५व्या मोसमात सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत आरसीबीचा कर्णधार फाफ डु प्लेसिस अव्वल स्थानावर आहे. डु प्लेसिसने दोन सामन्यात ९३ धावा केल्या आहेत. डु प्लेसिसकडे ऑरेंज कॅप आहे. ऑरेंज कॅपच्या शर्यतीत इशान किशन दुसऱ्या क्रमांकावर आहे, गोलंदाजीत आरसीबीचा फिरकी गोलंदाज वानिंदू हसरंगाने पर्पल कॅप पटकावली. हसरंगाने २ सामन्यात ५ विकेट घेतल्या आहेत. या यादीत उमेश यादव दुसऱ्या क्रमांकावर आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!