Share

“जमलं तर AIMIM मुस्लिम लीग, तालिबान, आयएसआय यांनाही सोबत घ्या”, ‘त्या’ वक्तव्यावरून भातखळकरांचा भुजबळांना टोला

Published On: 

🕒 1 min read

मुंबई:भाजप विरोधात लढण्यासाठी काँग्रेसला सोबत ठेवावे लागेल. तसेच ज्या राज्यात काँग्रेस कमजोर आहे, तिथे स्थानिक पक्षाला काँग्रेसने सहकार्य करावे तसेच काँग्रेस प्रबळ असलेल्या ठिकाणी इतरांनी नमते घेणे हे सूत्र त्यासाठी उपयुक्त ठरु शकते, असे पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी नाशिक येथे म्हटले. यावरच आता भाजप नेते अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी ट्वीट करत टोला लगावला आहे.

“भाजपच्या पराभवासाठी काँग्रेस सोबत हवीच! इति छगन भुजबळ. फक्त काँग्रेस कशाला? जमलं तर AIMIM मुस्लिम लीग, तालिबान, आयएसआय यांना देखील सोबत घ्या.”, असा खोचक टोला अतुल भातखळकर यांनी लगावल आहे.

दरम्यान यावेळी भुजबळ यांनी युपीए अध्यक्षपद यावर सुरु असलेल्या चर्चेवरही प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार हे वरिष्ठ आणि अनुभवी नेते आहेत. त्यांच्या अनुभवाचा फायदा देशातील राजकीय लढाईत व्हावा म्हणून युपीएच्या अध्यक्षपदासाठी त्यांच्या आग्रह धरला जात असावा. त्यासंबंधी युपीएमधील नेते इतरांचा मानसन्मान ठेऊन निर्णय घेतील. युपीएमध्ये समाविष्ट नसलेल्या राजकीय पक्षांचे नेते पवारांच्या संपर्कात आहेत. ते युपीएमध्ये एकत्रित अथवा सोबत येऊ इच्छित असतील. त्यातून अध्यक्षपदासाठी पवार यांच्या नावाची सूचना पुढे आली असावी.असे भुजबळ यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या:

IPL 2022 : “सकाळी उठल्यापासून ते…”, कैफनं अजिंक्य रहाणेच्या स्वभावाचा केला खुलासा!

IPL 2022: मेगा ऑक्शनमध्ये अनसोल्ड राहिल्यानंतर सामन्यात ‘या’ ठिकाणी दिसला इशांत शर्मा; चाहत्यांनी लावला डोक्याला हात!

विराट कोहलीचे बालपणीचे कोच संकटात; दिल्ली क्रिकेट असोसिएशन ‘असं’ पाऊल उचलण्याच्या तयारीत!

आलियासोबतच्या लग्नाबाबत रणबीरने केला मोठा खुलासा, म्हणाला..

“मला काहीच सांगायचं नाही, नो कमेंट” – अजित पवार

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!