मुंबई : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे सध्या पुन्हा एकदा वादाच्या भोवर्यात सापडले आहेत. परंतु आता त्यांनी त्यांच्यासोबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देखील अडचणीत ओढले असल्याचे पहायला मिळत आहे. याचे कारण म्हणजे आज करुणा मुंडे यांनी फेसबूक लाईव्ह करत परळीत जावून धनंजय मुंडेंवरील सर्व आरोप सिद्ध करणार असल्याचे जाहीर केले.
तसेच यावेळी बोलताना त्यांनी सांगितले कि, ‘माझ्या नवऱ्याने मला अनेक नेत्यांच्या अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. अजितदादांच्या देखील अनेक गोष्टी त्यांनी सांगितल्या आहेत.’ असे वक्तव्य त्यांनी केल्यामुळे आता राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधान आलेलं आहे. धनंजय मुंडे हे मध्यंतरी चांगलेच वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. करुणा मुंडे या धनंजय मुंडे यांच्यावर अनेक आरोप करत जनतेसमोर आल्या होत्या.
तसेच यावेळी बोलताना त्या म्हणाल्या कि, ‘माझ्यासोबत गेली ७-८ महिने जे सुरु आहे ते सर्व सांगण्यासाठी मी परळीमध्ये रविवारी १२ वाजता जाणार आहे. आतापर्यंत मला खूप वेळा धमकावलं गेलं आहे. माझ्या हाती अनेक गोष्टी लागल्या आहेत. त्या मी सोशल मीडियावर शेअर करणार तोच मला माझ्या मुलीच्या वयाच्या एका तरुणीने फोन करुन धमकावलं. मी तिला अजिबात घाबरणार नाही, असंही करुणा मुंडे या फेसबुक लाईव्हमध्ये म्हंटलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘काका संजय गांधींनी माझ्या वडिलांचे ऐकले असते तर ‘तो’ अपघात झाला नसता’, राहुल गांधींचा खुलासा
- मराठा आरक्षणातील अडसर दूर होणार ? संभाजीराजेंनी राष्ट्रपतींकडे केल्या ‘या’ २ महत्वाच्या मागण्या
- ‘आपलेच नगरसेवक घेऊन जात फोडले म्हणून सांगून स्वतःच्या पक्षप्रमुखाला वेडं बनवायचं म्हणजे…’
- बारामती नगरपरिषदेच्या ठरावाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
- ‘काही लोकांमुळे सहकारी खाते बदनाम होतंय, फटका माझ्यासारख्याला बसतो’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

