Share

‘या’ खेळाडूने केलेल्या आरोपांच्या चौकशीसाठी त्रिसदस्यीय समिती स्थापन

Published On: 

नवी दिल्ली: भारताची आघाडीची टेबल टेनिसपटू मनिका बत्राने राष्ट्रीय प्रशिक्षकांवर सामना निश्चिती करण्याची सूचना दिल्याचा आरोप केला होता. या प्रकरणी चौकशी करण्यासाठी दिल्ली उच्च न्यायालयाने त्रिसदस्यीय समिती स्थापन केली आहे.

भारतीय टेबल टेनिस महासंघाने निवड प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने पार पाडावी, असे न्यायमूर्ती रेखा पल्ली यांनी सुनावणीत म्हटले आहे.मनिका बत्राने आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या निवडीसाठी राष्ट्रीय प्रशिक्षण शिबिरात अनिवार्य हजेरीच्या महासंघाच्या नियमाबाबत आव्हान देणारी याचिका केली होती. तसेच मनिकाने राष्ट्रीय प्रशिक्षक सौम्यदीप रॉय यांच्यावर सामनानिश्चितीसाठी दडपण टाकल्याचाही आरोप केला होता.

दरम्यान टेबल टेनिस महासंघावर प्रशासकाची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणीही तिने केली आहे. तसेच हायकोर्टाने नेमलेल्या समितीमध्ये दोन न्यायाधीश आणि एका खेळाडूचा समावेश आहे. या समितीला चार आठवडय़ात अहवाल देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तर आशियाई टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धेसाठी मनिकाला भारतीय संघातून वगळण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!