🕒 1 min read
मुंबई: देशभरात सध्या कोरोनाच्या विळख्यात सर्वसामान्य नागरिकांपासून ते अनेक बॉलीवूड मधील कलाकार देखील अडकल्याचे समोर येत आहे. कोरोनाच्या वाढत्या धोक्यामुळे सध्या देशभरातील लोकांचं जनजीवन विस्कळीत झालं. वाढत्या रुग्णसंख्येमुळं आरोग्य व्यवस्थेवरील ताणही वाढला आहे. मोठ्या प्रमाणावर वैदयकीय सुविधांचा तुटवडा जाणवत आहेत. त्यामुळे अपूऱ्या सेवेमुळे अनेक रुग्णांचे जीव गेल्याचे देखील समजत आहे. प्रसिद्ध अभिनेत्री मीरा चोप्राच्या बाबतीत देखील असे घडले आहे. योग्य उपचार न मिळाल्यामुळं तिच्या कुटुंबातील दोन व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. यासाठी तिनं सरकारला जबाबदार धरत प्रतिक्रिया दिली आहे.
This is heartbreaking. Something ive been saying it, these are not covid deaths, these are murders by our failed infrastructure. The only country where people are dying bcoz there is no oxygen. Appalling!!!!#COVID19India #RahulVohra https://t.co/RZwuoS9xZ0
— Meera Choppra (@MeerraChopra) May 9, 2021
“ही अत्यंत वेदनादायी घटना आहे. आपलं सरकार नेमकं करतंय तरी काय. माझ्या कुटुंबीयांचा मृत्यू हा कोरोनामुळं नाही तर अपयशी ठरलेल्या आपल्या आरोग्य व्यवस्थेमुळं झाला आहे. आपला एकमेव देश आहे जिथं ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळं लोक मरत आहेत. सर्वत्र भीतीचं वातावरण आहे. कधी कोणासोबत काय घडेल हे आता सांगता येणार नाही.” अशा आशयाचं ट्विट करुन मीरानं आपला संताप व्यक्त केला आहे.
मीरा देशभरात घडणाऱ्या विविध घडामोडींवर रोखठोकपणे प्रतिक्रिया देते असते. यावेळी तिने कोरोनावर नियंत्रण मिळवण्यास अपयशी ठरलेल्या सरकारवर केलेले तिचे ट्वीट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. काही तासांत हजारो नेटकऱ्यांनी तिच्या वक्तव्यांवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. मीरा ही दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिनं काही वर्षांपुर्वी बॉलिवूडमधून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. परंतु ती त्यामध्ये ती अपयशी ठरली परिणामी तिनं आपलं लक्ष दाक्षिणात्य सिनेमांच्या दिशेनं वळवलं.
महत्त्वाच्या बातम्या
- आता ‘या’ मोठ्या शहरात १२ मे पासून पूर्ण लॉकडाऊन !
- ऑक्सिजन वाहून नेणाऱ्या टँकरना टोल माफी, केंद्राचा निर्णय
- मराठा समाजाला आरक्षण मिळू नये याची काँग्रेस-राष्ट्रवादीने पायाभरणी केली – घाटगे
- ‘माझ्याकडे नवरा आहे…’; ट्विंकलने युजरला दिले गमतीशीर उत्तर
- ‘मुख्यमंत्र्यांनी आरक्षणाचा विषय गांभीर्याने घेतला नाही, राज्याचे प्रमुख म्हणून त्यांनी राजीनामा द्यावा’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
