🕒 1 min read
मुंबई: वीजनिर्मिती घटल्याने भारनियमनाचे संकट असतानाच आता वीजग्राहकांवर अतिरिक्त बिलाचा भारही येणार आहे. या महिन्यात ग्राहकांना अतिरिक्त सुरक्षा ठेव भरावी लागणार असून त्या रक्कमेसह आता देयके ग्राहकांकडे येऊ लागली आहेत. वर्षभरातील दोन महिन्यांच्या सरासरी वीज वापरानुसार सुरक्षा ठेवीची रक्कम आकारण्यात येणार आहे. यावरूनच भाजप नेते अतुल भातखळकर (atul bhatkhalkar) यांनी मविआ सरकारवर (MVA government) निशाणा साधला आहे.
“वीजनिर्मिती घटल्याने आधीच भारनियमनाची टांगती तलवार असतानाच आता वीजग्राहकांवर वर्षभरातील दोन महिन्यांच्या सरासरी वीज वापरानुसार सुरक्षा ठेवीची रक्कम आकारण्यात येणार आहे. महा लुटारू आघाडी सरकारने जनतेच्या पिळवणूकीची मर्यादा ओलांडली आहे. वीज नाही पण विजेचा जबरदस्त धक्का दिला आहे.”, असे ट्वीट अतुल भातखळकर यांनी केले आहे.
वीजनिर्मिती घटल्याने आधीच भारनियमनाची टांगती तलवार असतानाच आता वीजग्राहकांवर वर्षभरातील दोन महिन्यांच्या सरासरी वीज वापरानुसार सुरक्षा ठेवीची रक्कम आकारण्यात येणार आहे.
महा लुटारू आघाडी सरकारने जनतेच्या पिळवणूकीची मर्यादा ओलांडली आहे.
वीज नाही पण विजेचा जबरदस्त धक्का दिला आहे. pic.twitter.com/u53ntiqB5a— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) April 18, 2022
दरम्यान आतापर्यंत एका महिन्याची सुरक्षा ठेव घेण्यात येत होती. आर्थिक वर्षाच्या पहिल्या महिन्यात ती आकारली जाते. मात्र आता ही ठेव दोन महिन्यांची करण्यात आली आहे. यामध्ये वर्षभरातील एकूण विजेच्या दोन महिन्यांच्या सरासरीचा विचार केला जात आहे.
महत्वाच्या बातम्या:
- धक्कादायक! भाजप आमदार गणेश नाईकांवर बलात्काराचा गुन्हा दाखल
- “… ही जातीय हिंसा घडवू पाहणाऱ्यांना चपराक आहे”, संजय राऊतांची टीका
- “चंद्रकांत पाटील निवडणुकीस उभे राहिले असते तर…”, संजय राऊतांचा खोचक टोला
- “चंद्रकांत पाटलांनी हिमालयात न जाता महाराष्ट्रातच राहावे कारण…”, संजय राऊतांचा टोला
- IPL 2022 CSK vs GT : मिलरच्या ‘किलर’ खेळीमुळं गुजरातचा विजय..! चुरशीच्या लढतीत चेन्नईला दिली मात
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
