Share

१३ वर्षे आयपीएलमध्ये एकाही संघाने विकत न घेतल्याने मुशफिकुर रहीमने उचलले ‘हे’ टोकाचे पाऊल

Published On: 

मुंबई : आयपीएलच्या आगामी पर्वासाठी खेळाडूंचा लिलाव हा १८ फेब्रुवारीला होणार आहे. या बोली प्रक्रियेआधी सर्व फ्रँचायजीने आपल्या ताफ्यातील रिलीज आणि रिटेन खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. यामध्ये अनेक संघांनी मोठ्या आणि अनुभवी खेळाडूंना रिलीज केलं आहे. यामुळे इतर फ्रँचायजींमध्ये या खेळाडूंना खरेदी करण्यासाठी रस्सीखेच पाहायला मिळणार आहे.

आयपीएल साठी एकूण 1097 खेळाडूंनी नोंदणी केली आहे. त्यापैकी 283 परदेशी खेळाडू असून 814 खेळाडू भारतीय आहेत. सर्वाधिक खेळाडू वेस्ट इंडीजचे असून त्यानंतर ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंनी नोंदणी केली आहे.

दरम्यान,बांगलादेशी खेळाडू देखील या प्रक्रियेत सहभागी होत असून शाकिब उल हसन, मुस्तफिज़ुर रहमान, सौम्य सरकार, लिटन दास आणि महमुदुल्लाह यांनी आपली नावे नोंदविली आहेत. एका बाजूला हे सुरु असताना आता बांगलादेशचा विकेटकीपर मुशफिकुर रहीमने आपले नाव या स्पर्धेच्या लिलाव प्रक्रियेतून काढून टाकले आहे.

मुशफिकुर रहीमने आपले नाव मागे घेतले यासाठी कारण देखील तसेच मजेशीर आहे. बांग्लादेशकडून बरेच सामने  खेळणाऱ्या या विकेटकीपर फलंदाजामध्ये आयपीएलच्या संघांनी कधीही रस दाखविला नाही. २००८ पासून प्रत्येक वर्षाच्या आयपीएलमध्ये खेळण्यासाठी त्याने आपले नाव लिलाव प्रक्रियेत दिले होते मात्र त्याला कोणताही खरेदीदार सापडला नाही. यामुळे रहीमने 13 वर्षानंतर आयपीएलच्या लिलावातून स्वत: ला वगळण्याचा निर्णय घेतला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!