Share

ट्विटरला दणका देणारे स्वदेशी ‘Koo’ ऍप नेमके आहे तरी काय ?

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली: सध्या सोशल मिडीयावर ‘Koo’ ऍपची चांगलीच चर्चा सुरु आहे. ‘Koo’ ऍप नेमके आहे तरी काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.ट्विटरला दणका देणारे स्वदेशी ऍप म्हणून ख्याती मिळविलेल्या ‘Koo’ ऍपबद्दल आपण आज माहिती करून घेणार आहोत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्यावर्षी जुलैमध्ये आत्मनिर्भर भारत ऍप इनोव्हेशन चँलेज लाँच केलं होतं.अटल इनोव्हेशन मिशनच्या अंतर्गत 8 कॅटेगरींमध्ये या आत्मनिर्भर भारत ऍप इनोव्हेशन चँलेंजचा समावेश होता. यामध्ये एक कॅटेगरी सोशल नेटवर्कींग ऍपची होती. या कॅटेगरीमध्ये अप्रमेय राधाकृष्णा नावाच्या एका युवकांने Koo नावाच्या मायक्रॉब्लॉगिंग स्टार्टअपच्या द्वारे ही स्पर्धा जिंकली होती.

दरम्यान,भारत सरकार ट्विटरमध्ये शीतयुद्ध सुरु आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने अंतर्गत विषयांवर वक्तव्य करणाऱ्या रीहाना आणि ग्रेटा यांना फटकारले होते. मात्र ट्विटरचे सीईओ जॅक डॉर्सी यांनी रीहानाच्या या ट्विट ला लाईक केले आहे आणि यामुळे देखील एक वाद निर्माण झाला आहे. जॅक डॉर्सी यांनी अप्रत्यक्ष रीहनाला पाठींबा दिल्याचे चित्र असल्याने बरेच लोक सध्या नाराज आहेत.

यातच आता मोदी आणि सरकारमधील मंत्र्यांनी स्वतः ‘कु’ या भारतीय मायक्रो ब्लॉगिंग साइटला प्रोत्साहन द्यायला सुरुवात केली आहे.’कु’ बाबत मोठी चर्चा सुरु असताना मंगळवारी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी सांगितले की तेही आता या व्यासपीठावर उपलब्ध असणार आहेत. जनतेला त्यांनी या व्यासपीठाचा मोठ्याप्रमाणावर वापर करावा असे आवाहन केले आहे.

ट्विटरप्रमाणे या ऍपमध्ये युजर्स इतर लोकांना फॉलो करू शकतात आणि फोटो, ऑडिओ, मजकूर आणि व्हिडिओ फॉर्मेटमध्ये पोस्ट शेअर करू शकतात. यामध्ये दुसऱ्यांसोबत चॅट करू शकता. तसेच ऍप च्या माध्यमातून युजर्स सेलिब्रिटी, न्यूज चॅनेल, पत्रकार आणि बऱ्याच मोठ्या व्यक्तींना फॉलो करू शकता.

काही महत्त्वाचे लोक या ऍपचा वापरकरत आहेत यामध्ये केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद, कर्नाटकचे उपमुख्यमंत्री, पोलीस उपायुक्त, अनिल कुंबळे आणि जवागल श्रीनाथ यांचा समावेश आहे. हा ऍप अँड्रॉइड आणि आयओएस दोन्ही युजर्ससाठी उपलब्ध आहे. Google Play Store वरून १ मिलियन हून अधिक लोकांनी हा ऍप डाऊनलोड केला आहे.

दरम्यान कू वर आयटी मंत्रालयाशिवाय अन्य सरकारी विभागांनीही खाते उघडलं आहे. कू वर माय गाव, डिजिटल इंडिया, इंडिया पोस्ट, नॅशनल इनफोर्मेटिक्स सेंटर (एनआईसी), नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अॅन्ड इनफोर्मेशन टेक्नोलॉजी, कॉमन सर्व्हिस सेंटर, उमंग अॅप, डिजी लॉकर, नॅशनल इंटरनेट एक्सचेंज ऑफ इंडिया यांनी देखील व्हेरीफिकेशन केले आहे.

राधाकृष्ण यांच्या म्हणण्यानुसार, इतर मायक्रॉब्लॉगिंग ऍपवर इंग्रजीव्यतिरिक्त मातृभाषा असणाऱ्यांना फारसा वाव नाही मात्र, Koo ऍपवर भारतीय भाषांमध्ये विचार मांडण्याची संधी मिळते. त्यांचं म्हणणं आहे की, Koo येणाऱ्या काळात भारतीयांच्या आवाजाला एक आयाम देईल.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!