🕒 1 min read
कोल्हापूर : कोरोनाचा कहर कमी होताना दिसत असला तरी देखील अद्याप कोरोना संपूर्ण संपलेला नाही. त्यामुळे आजही कोरोन संदर्भात तितकीच खबरदारी घेणे गरजेचे आहे. दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्यमंत्री सतेज पाटील यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.
जिल्ह्यातील कोरोनाचा वेग मंदावत आहेत. मात्र सतेज पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे. यासंबंधी स्वत: पालकमंत्री पाटील यांनी आपल्या अधिकृत फेसबूक पेजवरून ही माहिती दिली आहे. सतेज पाटील परदेश दौऱ्यावरून आल्यावर कोरोना पॉझिटिव्ह झाले असल्याचे सांगण्यात येत आहे.
https://www.facebook.com/SatejPatil/posts/4012022732194926
‘माझी कोरोनाची चाचणी आज पॉझिटिव्ह आली असून माझी प्रकृती उत्तम आहे. डॉक्टरांच्या सल्यानुसार मी पुढील उपचार घेत आहे. लवकरच मी कोरोनावर मात करून पुन्हा आपल्या सेवेसाठी हजर होईन.’ अस त्यांनी यांच्या अधिकृत फेसबूक पेजवरून ही माहिती दिली आहे.
महत्वाच्या बातम्या
- मायदेशातील पराभवानंतर भारतीय संघाला आणखी एक दणका !
- हेच खरं यश आहे; गडचिरोलीतील ‘हा’ बदल बघून तुकाराम मुंढेंनी केलं भरभरून कौतुक !
- मेहनत फळाला आली : UPSC परीक्षेत साताऱ्याचा प्रथमेश पवार देशात तिसरा
- सचिन,लतादीदी,कोहली यासारख्या दिग्गज सेलिब्रिटींवर खरंच कुणी दबाव टाकू शकेल ?
- चित्रपट सृष्टीवर शोककळा ! ज्येष्ठ अभिनेते राजीव कपूर यांचं निधन, मुंबईत घेतला अखेरचा श्वास
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
