Share

मायदेशातील पराभवानंतर भारतीय संघाला आणखी एक दणका !

Published On: 

🕒 1 min read

चेन्नई : भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर इंग्लंडचा संघ भारताच्या दौऱ्यावर आला आहे. या दोन्ही संघांमध्ये कसोटी मालिका सुरु आहे. चेन्नईमध्ये सुरु असलेला पहिला कसोटी सामना आज संपला असून भारतीय संघाला मायदेशात पराभव स्वीकारावा लागला आहे. काल म्हणजेच चौथ्या दिवशी इंग्लंडला दुसऱ्या डावात अवघ्या १७८ धावांवर माघारी फिरावे लागले होते.

यानंतर हा सामना रंगतदार स्थितीत आला होता. मात्र, पहिल्या डावाप्रमाणेच दुसऱ्या डावात देखील भारतीय संघाची फलंदाजी गडगडली. यामुळे संघाचा २२७ धावांनी पराभव झाला. इंग्लंडने भारताला विजयासाठी 420 धावांचे आव्हान दिले होते. मात्र भारताला केवळ192 धावाच करता आल्या. इंग्लंडच्या भेदक गोलंदाजीसमोर कर्णधार विराट कोहली आणि शुबमन गिलचा अपवाद वगळता टीम इंडियाच्या एकाही फलंदाजाला तग धरता आला नाही. टीम इंडियाकडून विराट कोहलीने सर्वाधिक 72 धावा केल्या. तर युवा फलंदाज शुबमन गिलने 50 धावांची खेळी केली.

या पराभवामुळे भारतीय संघाला आणखी एक धक्का बसला आहे. भारतीय संघ आयसीसीच्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत अव्वल स्थानावर विराजमान होता. मात्र, इंग्लंडने पराभव केल्यामुळे भारतीय संघाला हे स्थान देखील गमवावे लागले आहे. अव्वल स्थानावरुन भारतीय संघ थेट चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. त्यामुळे भारतीय संघासाठी हा एक मोठा धक्का आहे.

तर, इंग्लंडने भारतावर विजय मिळवत या क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले आहे. या क्रमवारीत न्यूझीलंडचा संघ आता दुसऱ्या स्थानावर आहे, तर ऑस्ट्रेलियाचा संघ तिसऱ्या स्थानावर आहे. इंग्लंडने भारतीय संघाला हरवल्यानंतर भारतीय संघ थेट चौथ्या स्थानावर फेकला गेला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!