Share

मेहनत फळाला आली : UPSC परीक्षेत साताऱ्याचा प्रथमेश पवार देशात तिसरा

Published On: 

🕒 1 min read

सातारा – जिल्ह्यातील आरफळ गावचा सुपुत्र प्रथमेश पवार-पाटील याने केंद्रीय लोकसेवा आयोगाने घेतलेल्या परीक्षेत देशात तिसरा तर महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळवला आहे. त्याची केंद्रीय केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात असिस्टंट कम‍ांडंट या पदावर निवड झाली आहे. प्रथमेशने मिळवलेल्या यशामुळे त्याच्यावर अभिनंदनाचा आणि कौतुकाचा वर्षाव होत आहे.

छोट्याशा गावातील प्रथमेशने खडतर परिश्रम घेत, हे उज्ज्वल यश मिळवलं आहे. त्यामुळे त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्याचं माध्यमिक शिक्षण साता-यात आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंगपर्यंतचं शिक्षण पुण्यात झालं. नंतर दोन वर्ष जीवतोड मेहेनत घेत प्रथमेशनं हे घवघवीत यश मिळवलं आहे.

सातारा खरेदी-विक्री संघाचे माजी चेअरमन, आरफळ ग्रामपंचायतचे पहिले सरपंच कै. प्रल्हाद रामचंद्र पवार-पाटील यांचे प्रथमेश हे नातू आहेत. छोट्याशा गावातील प्रथमेशने खडतर परिश्रम घेत, हे उज्ज्वल यश मिळवलं आहे. त्यामुळे त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
पहिल्या दोन प्रयत्नांत मुलाखतीपर्यंत जाऊनही त्यांना अपयश आले होते.

या अपयशानेही न खचता त्यांनी कठोर परिश्रमाच्या जोरावर तिसऱ्या प्रयत्नात यशाला गवसणी घातली.प्रथमेश यांनी सलग 2 वर्षे पुण्यातील युनिक अकॅडमीत पूर्णवेळ अभ्यास केला. अखेर त्यांच्या कष्टाला फळ मिळालं. त्यांनी युपीएससी परीक्षेत हे घवघवीत यश मिळवलं. प्रथमेश यांच्या आई, वडिलांनी मुलाच्या या यशावर खूप समाधान व्यक्त केलंय.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!