Share

IPL 2022: धोनीचा मोठा खुलासा म्हणाला..

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: आयपीएल २०२२ पूर्वी निवडक खेळाडू वगळता सर्वांना लिलावात उतरावे लागणार आहे. दरम्यान, चेन्नई सुपर किंग्ज कर्णधार महेंद्रसिंह धोनीला संघात रिटेन करणार असल्याचे वृत्त समोर आले होते. मात्र आता स्वतः धोनीने एक मोठा खुलासा केला आहे. त्याने मोठे वक्तव्य करत सर्वाना धक्का दिला आहे.

चेन्नईने माझ्यावर पैसा वाया घालवू नये, असे धोनीने म्हटले आहे. सीएसकेचे मालक एन. श्रीनिवासन यांनी हा खुलासा केला आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली सीएसकेने आयपीएल २०२१चे विजेतेपद पटकावले आहे. श्रीनिवासन म्हणाले, ‘धोनी एक निष्पक्ष व्यक्ती आहे. त्याला कायम ठेवण्यासाठी संघाने जास्त पैसा खर्च करावा असे त्याला वाटत नाही. यामुळे संघाने रिटेन करावे, असे त्याला वाटत नाही. पण, पुढच्या सत्रातही धोनीने आमच्या संघातून खेळावे अशी माझी इच्छा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान धोनी सध्या टी-२० वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाशी मेंटॉर म्हणून जोडला गेला आहे. तर आयपीएल २०२२ मध्ये ८ ऐवजी १० संघ उतरतील. याशिवाय ६० ऐवजी ७४ सामने खेळवले जातील. मात्र, प्रत्येक संघ पूर्वीप्रमाणे केवळ १४-१४ सामने खेळणार आहे. डिसेंबर-जानेवारीमध्ये मेगा लिलाव होऊ शकतो.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!