मुंबई : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्यालय टिळक भवन दादर येथे महाराष्ट्राचे प्रभारी एच. के. पाटील यांच्या हस्ते काल(१ नोव्हें.) काँग्रेस सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी बोलत असतांना संविधान आणि लोकशाहीच्या संरक्षणासाठी मोठ्या संख्येने नागरिकांना काँग्रेसचे सदस्य करून घ्या असे आवाहन पाटील यांनी केले आहे.
यावेळी बोलतांना ते म्हणाले की,’काँग्रेस पक्षाची स्थापना मुंबईत शहरात झाली. मुंबई आणि महाराष्ट्राने काँग्रेस पक्ष, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांना ताकद दिली. आजपासून सुरू झालेल्या काँग्रेस सदस्य नोंदणीतही जास्तीत जास्त सदस्य नोंदवून मुंबई आणि महाराष्ट्राने संविधान आणि लोकशाहीच्या रक्षणाच्या मोहिमेत मोठ्या संख्येने नागरिकांना सहभागी करून घ्यावे.’
दरम्यान, पुढे ते म्हणाले की,’मुंबईच्या ऐतिहासिक आणि पवित्र महानगरात काँग्रेस पक्षाची स्थापना करण्यात आली. मुंबई काँग्रेस विचारांचं शहर आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या निर्देशानुसार देशभर १ नोव्हेंबरपासून काँग्रेस सदस्य नोंदणी अभियानाची सुरुवात झाली. मुंबई काँग्रेस १० लाख सदस्यांची नोंदणी करणार आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने मोठ्या प्रमाणात सदस्य नोंदणी करावी. आपले नेते राहुल गांधी २८ डिसेंबर रोजी शिवाजी पार्क येथे आयोजित मेळाव्याला संबोधित करणार आहेत, त्यावेळी काँग्रेस पक्षाच्या सदस्य नोंदणीचा आढावा त्यांच्यासमोर मांडा.’
महत्त्वाच्या बातम्या
- ‘भारतात मुस्लीम नाही, कायम हिंदू व्होट बँक होती, आहे व राहील’, असदुद्दीन ओवैसींचे खळबळजनक वक्तव्य
- हॅलोविन लूकने’अप्सरा’ सोनालीने चाहत्यांना केले घायाळ..
- इंधन दरवाढीचे सत्र सुरूच! लवकरच पेट्रोल १२० रुपयांचा टप्पा गाठणार
- यहॉं तो पुरी सरकारही काँच से बनी है; पडळकरांचे राज्य सरकारवर ताशेरे
- ‘…त्यानंतर त्याने माझ्यावर आरोप केले’, अनिल देशमुखांनी केला खुलासा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
