Share

इंग्लंडचा श्रीलंकेवर दणदणीत विजय

Published On: 

🕒 1 min read

दुबई: ट्वेन्टी-२० विश्वचषकात ‘अव्वल-१२’ फेरीतील काल झालेल्या सामन्यात इंग्लंडने श्रीलंकेवर २६ धावांनी मात केली. सलग चौथ्या विजयासह इंग्लंडने उपांत्य फेरीतील प्रवेश जवळपास निश्चित केला आहे.

इंग्लंडने दिलेल्या १६४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेचा डाव १९ षटकांत १३७ धावांत आटोपला. यष्टीरक्षक-फलंदाज जोस बटलरने ६७ चेंडूत नाबाद १०१ धावा करत शतकाच्या जोरावर इंग्लंडने श्रीलंकेवर विजय मिळविला. इंग्लंडने २० षटकांत ४ बाद १६३ अशी धावसंख्या उभारली. बटलर आणि कर्णधार ईऑन मॉर्गन (४०) यांनी इंग्लंडला सावरले. या दोघांनी १३ षटकांत चौथ्या गड्यासाठी ११२ धावांची भागीदारी रचली.

तर श्रीलंकेचे सलामीवीर पाथुम निसंका (१) आणि कुसाल परेरा (७) लवकर बाद झाले. चरिथ असलंका (२१) आणि भानुका राजपक्षे (२६) यांच्या योगदानानंतर वानिंदू हसरंगा (३४) आणि कर्णधार दसून शानका (२६) यांनी फटकेबाजी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, श्रीलंकेला अपयश आले. दरम्यान सलग चौथ्या विजयासह इंग्लंडने उपांत्य फेरीतील प्रवेश जवळपास निश्चित केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!