🕒 1 min read
नवी दिल्ली: भारताची आघाडीची खेळाडू द्रोणावल्ली हरिकाला ‘फिडे’ ग्रँड स्विस बुद्धिबळ स्पर्धेच्या पाचव्या फेरीत नातालिया पोगोनिनाने बरोबरीत रोखले. हरिकाने या फेरीच्या अखेरीस ३.५ गुणांसह तिला अन्य तीन महिला खेळाडूंसोबत दुसरे स्थान प्राप्त
तर दिव्या देशमुखने मात्र विजयाची नोंद केली आहे. हरिकाने आतापर्यंत या स्पर्धेत दोन विजय मिळवले असून तिचे तीन सामने बरोबरीत सुटले आहेत. भारताची युवा खेळाडू दिव्याने लॅटवियाच्या मदारा गोलस्तावर ४९ चालींमध्ये मात केली.
आर. वैशाली आणि वंतिका अगरवाल यांना अनुक्रमे सलोमे मेलिया (जॉर्जिया) आणि झाँसाया अब्दुमलिक (कझाकस्तान) यांनी बरोबरीत रोखले. तर पद्मिनी राऊतला पराभव पत्करावा लागला.
महत्त्वाच्या बातम्या
- IPL 2022: धोनीचा मोठा खुलासा म्हणाला..
- संविधान आणि लोकशाहीच्या संरक्षणासाठी मोठ्या संख्येने नागरिकांना काँग्रेसचे सदस्य करून घ्या- एच. के. पाटील
- माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीकडून अटक
- इंग्लंडचा श्रीलंकेवर दणदणीत विजय
- ‘…त्यानंतर त्याने माझ्यावर आरोप केले’, अनिल देशमुखांनी केला खुलासा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
