Share

मनपाच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांना कोरोना

Published On: 

औरंगाबाद : महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. निता पाडळकर शनिवारी (दि. २०) कोरोना पॉझिटिव्ह आल्या आहेत. शुक्रवारी (दि. १९) रात्रीपासून ताप असल्याने त्यांनी ॲन्टीजेन पद्धतीने चाचणी करून घेतली. त्यात पॉझिटिव्ह आल्याने सध्या त्या घरीच उपचार घेत आहेत.

झपाट्याने वाढत जाणारी कोरोना संख्या आणि त्यातच महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.नीता पाडळकर पॉझिटिव्ह आल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. पंधरा दिवसांपूर्वी दोन मार्चला त्यांनी कोरोना प्रतिबंधित लसीचा दुसरा डोस घेतला होता. त्यानंतरही त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.

शहरात जसजसे कोरोना रुग्ण वाढत आहोत तसतसे कोविड सेंटरबाबत समस्या वाढत आहेत. बेड फुल झाल्याने रुग्णांवर कधी बाकावर झोपायची वेळ येत आहे, तर कुठे रुग्णांना गेटवरच अडवून धरण्यासारखे प्रकार समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर रुग्णांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी महापालिकेने आगामी चार दिवसांत आणखी अकरा कोविड सेंटर्स सुरू करून ही संख्या २१ वर नेली जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यातच आता वैद्यकीय अधिकारीच पॉझिटिव्ह आल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!