Share

बोंबला…चायनीज लस घेतल्यानंतर अवघ्या दोन दिवसात इम्रान खान झाले कोरोना पॉझिटीव्ह

Published On: 

कराची – पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना कोरोनाची लागण झाली आहे. शनिवारी त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. इम्रान यांचे विशेष सहाय्यक फैजल सुलतान यांनी याबाबत माहिती दिली.

धक्कादायक म्हणजे, दोनच दिवसांपूर्वी त्यांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला होता. इम्रान खान सध्या होम आयसोलेशनमध्ये आहेत.इमरान खान यांनी चीनने तयार केलेली सिनोवॅक ही लस घेतली होती.

कोरोना लसीसाठी पाकिस्तान चीनवर अवलंबून असून आता चीनची लस घेतल्यानंतरच खान यांना कोरोनाची लागण झाल्याने चीनची कोरोना लस सेफ आहे का? याबाबत शंका उपस्थित केल्या जात आहेत.

दरम्यान,पाकिस्तानमध्येही कोरोनानं हाहाकार माजवला आहे. शनिवारी पाकस्तानमध्ये नवीन कोरोनाबाधित रुग्णांची लक्षणीय वाढ दिसून आली आहे. देशातील नागरिकांना महामारीच्या तिसऱ्या लाटेपासून वाचण्यासाठी काळजी घेण्याची विनंती पाकिस्तान सरकारने केली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!