औरंगाबाद : भाजपाची सत्ता असलेल्या राज्यामधील उत्तर प्रदेश, बिहार, गुजरात, मध्य प्रदेश राज्यात सर्वात जास्त अन्याय अत्याचार हे SC – ST समाजावर होत आहेत. आणि सरकार दावा करत आहे की, सर्व ठीक आहे. NCRP च्या अहवालात हे स्पष्ट आहे की, SC – ST समाजावर अन्याय, झालेले अँट्रासिटी गुन्हे खुप मोठ्या प्रमाणात वाढले असल्याचे संसदेत खासदार इम्तियाज जलील यांनी मुद्दा उपस्थित केला.
भाजप सत्ता असलेल्या राज्यामध्ये 45 हजार 935 आहेत. 2015 मध्ये हे 38 टक्के होते. 2019 मध्ये यामध्ये वाढ होवून यामध्ये 19 टक्के गुन्ह्यात वाढ देखील झालेली आहे. यामध्ये सर्वात आघाडीवर उत्तर प्रदेश हे राज्य आहे. मध्य प्रदेश, गुजरात, बिहार हे आहे. या समाजानेच नेहमी अन्याय अत्याचार सहन करायचे का ? असा सवाल देखील जलील यंनी संसदेमध्ये उपस्थित केला. दलित – आदिवासी समाजावर देशात होत असलेला अन्याय अत्याचार आणि मुस्लिम आरक्षणाबाबत इम्तियाज जलील यांनी प्रश्न उपस्थित केला.
जे कैदी तुरुंगात आहेत. त्याची आकडेवारी बघितली तर, 4 लाख 78 हजार मधून 66 टक्के SC – ST – OBC आहेत. सरकारी नोकऱ्यांमध्ये सुध्दा या समाजावर अन्याय होत आहे. केंद्रीय मंत्री रमेश पोखरियाल यांनी संसदेत रिक्त जागेबाबत माहिती दिली होती. त्यामध्ये सहा केंद्रीय मंत्रालयात 60 टक्के जागा SC – ST समाजातील आहे. 2847 – ST, 1686 SC समाजातील जागा रिक्त पदे असताना ती भरली का जात नाही. असा प्रश्न उपस्थित केला. गुजरात राज्यातील सर्वात उंच पुतळा सरदार वल्लभभाई पटेल यांचा उभारला आहे. परिसरात 5 हजार कोटी रुपये खर्च करून 122 गावातील आदीवासींची घरे बाधित करण्यात येणार आहे. याची स्पष्ट माहिती देण्यात यावी.
आदीवासींच्या बाजूने आम्ही आंदोलन उभे करु त्यांना बेघर होवू देणार नाही असा इशारा त्यांनी दिला आहे. जेव्हा सत्ता होती त्यावेळी आरक्षणाचा प्रश्न सोडवला नाही. देवेंद्र फडणवीस सरकार सत्तेत होते तेव्हा मुस्लिम आरक्षणाची मागणी काँग्रेस, राष्ट्रवादीचे नेते मागणी करत होते. पण आता महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार असताना मुस्लिम आरक्षण का दिले जात नाही? हा सवाल त्यांनी या वेळी उपस्थित केला.
महत्त्वाच्या बातम्या
- शहरात येताय, सावधान! ‘स्वॅब’से करेंगे सबका स्वागत
- प्राचार्य डॉ. शरद अदवंत यांचे निधन, शैक्षणीक-सामाजिक क्षेत्राची मोठी हानी
- ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मधील आणखी एका व्यक्तीला कोरोनाची लागण
- एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी लॉकडाउनमध्येही धावणार स्मार्ट सिटी बस
- ‘नितीन राऊत साहेब…उच्च राहणीमानाचा खर्च स्वतः च्या खिशातून करा’


