नाशिक : ‘सध्या पश्चिम बंगालमध्ये महाभारत घडत आहे. एकट्या ममता बॅनर्जीं विरोधात भाजपनं संपूर्ण सत्ता मैदानात उतरवली आहे. एका महिलेचा पराभव करण्यासाठी संपूर्ण सरकार मैदानात आहे. पण ममता बॅनर्जी सत्ता राखतील असा विश्वास वाटतो. भाजपच्या जागा वाढतील. पण त्यांना बहुमत मिळणार नाही. ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेस पक्षाला सत्ता राखण्यात यश येईल,’ असे वक्तव्य शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी केले आहे.
‘एका महिलेचा पराभव करण्यासाठी भारतीय जनता पक्षानं पश्चिम बंगालमध्ये संपूर्ण सत्ता कामाला लावली आहे. या संघर्षात आम्ही पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या पाठिशी ठामपणे उभे आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय जनता दलानंदेखील असाच निर्णय घेतला आहे,’ असं राऊत म्हणाले. ते नाशिकमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
‘भाजपच्या जागा वाढतील. मात्र, बहूमत हे फक्त ममता यांनाच मिळेल. शिवसेनेने पश्चिम बंगालमध्ये निवडणूक लढण्याचा विचार सुरु होता. मात्र, यावेळी ममता यांना पाठिंबा देणे योग्य असल्याचे शिवसेनेचे मत झाले. त्यामुळे शिवसेना बंगालमध्ये निवडणूक न लढता, ममता यांना पाठिंबा देणार आहे.’ असे वक्तव्य शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केले आहे.
यावेळी खासदार संजय राऊत यांनी नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आढावा देखील घेतला आहे. यानंतर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
महत्त्वाच्या बातम्या
- सोनिया गांधी सक्रीय राजकारणात नाहीत, आता पवारांनीच UPA चे नेतृत्व करावे
- प्राचार्य डॉ. शरद अदवंत यांचे निधन, शैक्षणीक-सामाजिक क्षेत्राची मोठी हानी
- ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मधील आणखी एका व्यक्तीला कोरोनाची लागण
- एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी लॉकडाउनमध्येही धावणार स्मार्ट सिटी बस
- ‘नितीन राऊत साहेब…उच्च राहणीमानाचा खर्च स्वतः च्या खिशातून करा’


