मुंबई – महानगरपालिकेत भारतीय जनता पक्षाचाच झेंडा फडकणार असं सांगताना भाजपा मुंबई अध्यक्ष व आमदार मंगल प्रभात लोढा म्हणाले की, महानगर पलिकेत भाजपची सत्ता आल्यावर महानगरपालिकेच्या शाळांची गुणवत्ता वाढवण्याकडे लक्ष केंद्रीत करणार असल्याची घोषणा लोढा यांनी सायन कोळीवाडा येथे बिहार चौपाल या कार्यक्रमात केली.
सायन कोळीवाडा येथे बिहार चौपाल या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना मंगल जी म्हणाले की, मुंबईतील विभिन्न समाजातील लोक एकत्रित यावे याकरिता चौपाल हे अभियान राबवण्याचा निर्णय घेतला आहे. या कार्यक्रमांअंतर्गत अनेक विभागात जाऊन वेगवेगळ्या समाजातील लोकांना एकत्रित करून चर्चा सत्र घेऊन त्यांचे विचार व समस्या मांडाव्या याकरिता या चौपालांचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबईत अनेक भागात या कार्यक्रमाला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. बिहारी व उत्तराखंडी चौपालची जबाबदारी पूर्व राज्यमंत्री अमरजीत मिश्र यांच्याकडे देण्यात आली होती. अमरजीत मिश्र यांचे अभिनंदन करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष अमरजीत मिश्रा जी म्हणाले की, बिहार आणि उत्तराखंड मधील विभिन्न समाजातील नागरिकांसोबत थेट संवाद साधण्यासाठी दोन्ही राज्यातील वेगवेगळ्या २०० ठिकाणी चौपाल कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. आठवडाभर चालणाऱ्या या चौपालला सर्वत्र यश मिळत आहे. सायन कोळीवाड्यातील आमदार कॅप्टन तामिल सेल्वन यांनी बिहारी समाजाचे प्रश्न सोडविण्याचे आश्वासन त्यावेळी दिले असल्याचे मिश्रा यांनी सांगितले.
मिश्रा म्हणाले की, बिहार सेलचे अध्यक्ष मनोज झा आणि सरचिटणीस सुशांत अंबाष्ट यांनी चौपालची रूपरेषा कशा पध्दतीने असेल हे मांडले. तसेच अणुशक्ती नगर येथील भाजपा कार्यालयाच्या सभागृहात उत्तराखंड सेल भाजपा अध्यक्ष महेंद्रसिंग गोसाई यांनी उत्तराखंड चौपाल संदर्भात आपले विचार मांडले. राजेंद्र शर्मा, महेश पांडे यांच्यासह समाजातील विविध स्तरातील लोकांनी आपले विचार याप्रसंगी मांडले. उत्तराखंड सेलचे प्रभारी अमरजीत मिश्रा यांनी ९ नोव्हेंबर रोजी मुंबई भाजपने आयोजित केलेला उत्तराखंड दिन सोहळा यशस्वी पार पडेल असा विश्वास त्यांनी त्यावेळी व्यक्त केला.
महत्त्वाच्या बातम्या
- विंडीजचे आव्हान कायम; बांगलादेशवर रोमहर्षक विजय
- बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना आजही आहे, इथं कोणावर अन्याय होणार नाही- संजय राऊत
- वळसे पाटील कोरोनावर मात करून लवकरच सेवेत रुजू व्हाल, याची खात्री- अजित पवार
- आर्यन खानच्या मदतीला जुही चावला आली धावून म्हणाली…
- पाकिस्तान विरुद्ध अफगाणिस्तान मॅचदरम्यान फॅन्समध्ये तुफान हाणामारी; पाहा व्हिडीओ


