🕒 1 min read
शारजा : ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या शुक्रवारी झालेल्या सामन्यात वेस्ट इंडिजने बांगलादेशला तीन धावांनी पराभूत करत विजयासह स्पर्धेतील आव्हान कायम ठेवले. निकोलस पूरनच्या २२ चेंडूत ४० धावा या तुफान फटकेबाजीनंतर गोलंदाजांच्या सांघिक कामगिरीमुळे वेस्ट इंडिजने शुक्रवारी ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या सामन्यात बांगलादेशला तीन धावांनी पराभूत केले. यामुळे बांगलादेशचे स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात आले आहे.
हा सामना शारजा येथे झाला होता. या सामन्यात विंडीजने १४३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशला २० षटकांत ५ बाद १३९ धावा करता आल्या. सलग तिसऱ्या पराभवामुळे त्यांना उपांत्य फेरी गाठणे जवळपास अशक्य झाले आहे.
दरम्यान आघाडीच्या फळीतील फलंदाज बाद झाल्यावर लिटन दास (४४) आणि कर्णधार महमदुल्ला (नाबाद ३१) यांनी पाचव्या गडय़ासाठी ४० धावांची भागीदारी उभी केली. त्यानंतर दासला ड्वेन ब्राव्होने माघारी पाठवले. दरम्यान बांगलादेश संघाला शेवटच्या षटकात १३ धावांची गरज असताना आंद्रे रसेलने केवळ नऊ धावा दिल्या. आणि विजय खेचून घेतला.
महत्त्वाच्या बातम्या
- नवविवाहित आयुषी आणि सुयश टिळक यांच्या देवदर्शनाची जोरदार चर्चा
- बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना आजही आहे, इथं कोणावर अन्याय होणार नाही- संजय राऊत
- ‘होय मी भंगारवाल्याची मुलगी’, मलिकांच्या मुलीने ट्वीट करत दिले टीकाकारांना प्रत्युत्तर
- ज्याने इतरांना जेलमध्ये टाकलं त्याच्या मागे आता कोर्ट कचेऱ्या लागतील- छगन भुजबळ
- ‘शिवसेनेने विश्वासघात केल्यामुळे काँग्रेस पक्षाला राज्यात सत्तेची लॉटरी लागली’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
