Share

औरंगाबादेतील स्लम वसाहतींमधील समस्यांकडे महापालिकेचे दुर्लक्ष..!

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : शहरातील स्लम भागाच्या विकासाकडे महानगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. या भागातील स्वच्छता व रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. पालिका प्रशासनाने स्लम भागातील ५६ वसाहतींकडे लक्ष द्यावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. मात्र गेल्या दोन वर्षांपासून महानगरपालिकेवर प्रशासकीय राज आहे. त्यांच्या समस्या ऐकून घेण्यासाठी प्रशासकांकडे वेळ नसल्याने समस्या मांडायच्या तरी कोणाकडे असा प्रश्न सामान्यांना पडला आहे.

शहरात महानगरपालिकेने झोपडपट्टयांचा स्लम विभागात समावेश केलेला आहे. या विभागाच्या विकासासाठी विशेष अर्थसंकल्पात समावेश केलेला असतो. परंतु मनपा प्रशासनातील अधिकारी या वसाहतींच्या विकासाकडे लक्ष देत नाहीत. त्यामुळे शहरातील झोपडपट्ट्यांचे अवस्था आज अतिशय खराब झाली आहे. ठिकठिकाणी पडलेले कचऱ्याचे ढिगारे, दुर्गंधी, मोकाट फिरणारी जनावरे असे चित्र आज या वसाहतीमध्ये पाहायला मिळते. अनेक ठिकाणी सार्वजनिक शौचालयांची अवस्था बिकट असल्याने अनेक जण रस्त्यावरच शौचास बसलेले दिसतात.

आज शहरातील इंदिरा नगर, गारखेडा, संजय नगर, मुकुंदवाडी, आंबेडकर नगर ,राहुल नगर, नागसेन नगर, कबीर नगर, मिलिंद नगर, हमाल वाडा, सिल्क मिल कॉलनी, जय भिम नगर, प्रगती कॉलनी, शहा बाजार या वसाहतींमधील मुख्य रोड तसेच अंतर्गत गल्ल्यांमध्ये रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. तसेच पथदिवेही मोठ्या प्रमाणात बंद आहेत. नाल्यांची सफाई नियमितपणे होत नाही. औषध फवारणी केली जात नाही. मनपा प्रशासनाने स्लम भागांकडे लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!