🕒 1 min read
परभणी : दुचाकीवर मास्कविना जात असलेल्या दोघांना मनपा कर्मचाऱ्यांने थांबवून विचारणा केली असता. कर्मचाऱ्याला शिवीगाळ करत मारहाण केल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. मास्कबाबत विचारणा केली असता मारहाण करणे ही बाब गंभीर असल्याने पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे.
सफाई कर्मचारी रमेश भराडे व त्यांच्या सोबत काही कर्मचारी विनामास्क फिरत असलेल्यांवर कारवाई करण्यासाठी पाथरी रोड वरील विसावा पोलीस चौकी समोर तैनात होते. दरम्यान दोन युवक स्कुटीवरून विनामास्क जात असल्याचे दिसताच रमेश यांनी त्या युवकांना अडवून मास्क का घातला नाही अशी विचारणा केली असता. त्या युवकांनी रमेश यांना शिवीगाळ करत मारहाण केली. धारदार शस्त्र काढून जिवे मारण्याची धमकी दिली.
दरम्यान रमेश यांच्या सोबत तैनात असलेले सहकाऱ्यानी मध्यस्थी करून भांडण सोडवले. मारहाण करणाऱ्याचे नाव रिजवान खान रफिक खान आहे. या प्रकरणी रमेश यांनी गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. विनामास्क का फिरता असा प्रश्न विचारणाऱ्यास मारहाण करणे ही दुर्दैवी घटना आहे सध्या कोरोना वाढत आहे. अशा वेळी नागरिकांनी स्वतः काळजी घ्यायला हवी.
महत्वाच्या बातम्या
- स्त्री शक्तीचा अपमान केल्याचा आरोप होत असलेले कॉंग्रेस नेते भुपेंद्र सिंह हुडा यांनी नेमकं काय केलंय ?
- लसीचे दोन डोस घेऊनही जालन्यात दोन आरोग्य अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण
- विदर्भ मराठवाड्यावर अन्याय सुरूच… वैधानिक महामंडळासह वॉटरग्रीड योजना बारगळली
- भारत आता हुकुमशाही असलेला देश बनला आहे’; राहुल गांधी यांचा केंद्र सरकारवर आरोप
- मीच सर्वोत्कृष्ट खेळाडू ; राजस्थान रॉयल्सच्या प्रश्नावर जडेजाचं भन्नाट उत्तर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
