औरंगाबादः गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या महापालिकेच्या संत एकनाथ रंग मंदिराच्या विकासकामांना गती मिळाली आहे. संत एकनाथ रंग मंदिराच्या दुरुस्तीसाठी शहरात मोठ्या स्वरूपात जनआंदोलन उभे राहिले होते. मुक्ता बर्वे, प्रशांत दामले, सुमित राघवन या कलाकारांनी देखील हा प्रश्न उपस्थित केल्यामुळे संत एकनाथ रंग मंदिराचा विषय मोठ्या प्रमाणावर चर्चिला गेला होता. मनपा आयुक्तांनी दिलेली ३० सप्टेंबर पर्यंतची डेडलाईन टळली आहे. त्यामुळे रंग मंदिराचा पडदा केव्हा उघडणार? असा प्रश्न कलाप्रेमींकडून उपस्थित केला जात आहे.
आत्तापर्यंत अनेक वेळा या रंगमंदिराची दुरावस्था दूर करण्यासाठी लाखोंचे कंत्राट निघाले. तरीही परिस्थिती काही सुधरलेली नाही. वेळोवेळी निघणाऱ्या कंत्राटांमुळे रंगमंदिर नाही, तर चक्क कंत्राटदार आणि नगरसेवकांचा फायदा झाला असे आरोप झाले आहेत. प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी ३० सप्टेंबर पर्यंत वेळ दिली होती. मात्र या निर्धारित वेळेतही संत एकनाथ रंगमंदिराचे काम पूर्ण होऊ शकलेले नाही. यासाठी ८ कोटी रुपयांचा निधी खर्च केला जात आहे.
मात्र गेल्या काही वर्षांपासून या रंगमंदिराच्या नूतनीकरणाचे काम संथ गतीने सुरु आहे. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने कार्यक्रमांची रेलचेल सुरु झाली आहे. सध्या शहरातील दोनच नाट्यगृहे सुरु असून त्यातही ५० टक्क्यांची अट आहे. या परिस्थितीत संत एकनाथ रंगमंदिराचा पडदा कधी उठणार, असा प्रश्न रसिकांना पडला आहे. शहरातील नाट्यगृहांमध्ये प्रेक्षकांसाठी मर्यादा घालण्यात आली आहे. येथे फक्त ५० टक्केच रसिक प्रेक्षक उपस्थित राहू शकतील, अशी राज्य शासनाने अट घातली आहे. ही अट शासनाने लवकरात लवकर शिथिल करावी, अशी मागणी व्यवस्थापकांकडून करण्यात येत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ’40 नेत्यांचे घोटाळे बाहेर काढणार, 1 जानेवारीला महाराष्ट्र घोटाळामुक्त करणारच’
- पंतप्रधानांची दिवाळी जवानांसोबत, सर्जिकल स्ट्राईकच्या आठवणींना दिला उजाळा
- पारंपरिक वेशभूषेत मानसीने केली पतीसोबत अनोखी दिवाळी साजरी
- ‘केंद्र सरकारचं मन मोठं नाही तर सडकं, कुचकं आहे’, संजय राऊतांचा घणाघात
- ‘100 रुपये वाढवायचे आणि 5 रुपये कमी करायचे, हे कसलं मोठं मन??’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
