औरंगाबाद: महापालिकेसाठी प्राधान्यावर असलेल्या विषय आकृतिबंध प्रस्तावास लवकरात लवकर मुख्यमंत्र्यांनी मान्यता द्यावी अशी विनंती आज (दि. ५) औरंगाबाद महानगरपालिका प्रशासक तथा आयुक्त आस्तिक कुमार पांडेय यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली.
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज औरंगाबाद दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विभागांची आढावा बैठक घेतली.
या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी प्रत्येकाला त्यांचे प्राधान्य क्रमानुसार शासन मान्यतेसाठी विषय विचारले. यावेळी प्रशासकांनी औरंगाबाद महानगरपालिका येथे नोकर भरतीसाठी शासनास पाठविण्यात आलेल्या आकृतीबंधाच्या प्रस्तावास शासनाने प्राधान्याने मंजूर करण्याबाबत सांगितले. महापालिकेच्या कर्मचारी भरतीचा आकृतीबंध प्रस्ताव २०१७ पासून रखडलेला आहे.
महापालिकेचा आकृतीबंध मंजुरीच्या अंतिम टप्प्यात असून राज्य शासनाकडून मंजुरी मिळाल्यावर मेगाभरती होणार आहे. सुमारे तीन हजार पदांसाठी ही भरती होऊ शकते, असे मानले जात आहे. त्यामुळे शासनाकडून आकृतीबंध मंजूर करून घेणे व त्यानुसार महापालिकेत नोकर भरती करणे याला प्रशासनाने प्राधान्य दिले आहे. महापालिका खूप कमी मनुष्यबळावर चालवावी लागत आहे.
येत्या सहा महिन्यात महापालिका सेवेमध्ये असलेले जास्तीत जास्त अधिकारी- कर्मचारी सेवानिवृत्त होणार आहेत. त्यासाठी शासनाकडे पाठलवेला आकृतिबंध तातडीने मंजूर होणे गरजेचे असल्याचे आयुक्तांनी सांगितले. यामध्ये आधीच्या ४३४४ पदांव्यतीरिक्त २९२४ पदांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे रिक्त पदांसह नवीन पदांची देखील भरती होऊ शकते.
महत्वाच्या बातम्या
- शेतकरी आंदोलनात सरकारची डोकेदुखी ठरत असलेल्या ट्विटरवर भारत सरकार बंदी घालणार ?
- पदोन्नतीसाठी देखील आरक्षणाची तरतूद करा; रामदास आठवलेंची राज्यसभेत मागणी
- बागवे व जोशींची नियुक्ती ‘पुणे कॉंग्रेस’ची मरगळ दूर करणार का?
- ‘बाळासाहेबांच्या स्मारकासाठी महापौर निवास ताब्यात घेऊन स्मारक न करणं याला टाइमपास म्हणतात’
- एका वर्षात स्मार्ट सिटीने ४३८ कोटीचे प्रकल्प पूर्ण केले- प्रशासक पांडेय


