मुंबई : राज्य विधिमंडळाच्या दोन दिवसीय हिवाळी अधिवेशनाला कालपासून सुरुवात झाली आहे. कालपासून सुरु झालेल्या या अधिवेशनात विरोधक चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसून आले होते. विरोधकांचा हा बाणा आजही कायम असल्याचं दिसून येत आहे. विरोधकांनी हे अधिवेशन सुरु होण्याआधीच सरकारला घेरण्यासाठी मोर्चेबांधणी केल्याचं दिसून आलं होतं.
दरम्यान, विरोधकांच्या प्रश्नांवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जोरदार उत्तर दिलं आहे. यावेळी या दोन्ही मंत्र्यांनी तुफान फटकेबाजी केल्याचं दिसून आलं. उद्धव ठाकरेंनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि चंद्रकांत पाटील यांच्या प्रश्नांना चोख उत्तर दिलं. यावेळी त्यांनी फडणवीसांना खोचक टोला लगावला.
‘देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत जावेत, अशी सर्वांची इच्छा आहे. सुधीर मुनगंटीवार यांची तर अशी इच्छा आहेच आहे,’ असं म्हणत त्यांनी महाविकास आघाडी अंतर्गत भांडणांमुळे पडणार अशी टीका करणाऱ्या भाजप नेत्यांमध्ये राज्याच्या नेतृत्वावरून अंर्तगत चुरस निर्माण करून देण्याचा प्रयत्न केला आहे.
दरम्यान, ठाकरेंनी मराठा आरक्षणावर देखील भाष्य केलं. ‘मराठा समाजाला आरक्षण देताना इतर समाजाचं आरक्षण कमी करणार का? ओबीसी समाजाचं आरक्षण कमी करणार का? दुसऱ्या समाजाच्या आरक्षणात घुसवणार का? असे प्रश्न केले जात आहेत. आज मी या सभागृहात अत्यंत जबाबदारीने ठामपणे सांगतो, मराठा समाजाला न्याय, हक्क मिळवून देताना दुसऱ्या समाजाचं एक कणही काही काढून घेणार नाही, रेकॉर्डवर घ्या’ असं स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- पदवीधरच्या लोकांनी पराभव केला ते भाजपला खूप झोंबलंय; अजितदादांची तुफान टोलेबाजी
- ‘ते’ बंगले खाजगी प्रॉपर्टी नाहीत, झालेल्या खर्चात काही गैर नाही – अशोक चव्हाण
- ‘मराठा तरुणांना आरक्षण मिळवून देण्यासाठी टोकाचा संघर्ष करू’
- ‘रेकॉर्ड वर घ्या, मराठा समाजाला न्याय देताना दुसऱ्या समाजाचं एक कणही काही काढून घेणार नाही’
- शेतकऱ्यांची माफी मागणार का? असा प्रश्न विचारताच दानवेंनी काढला पळ


