Share

पदवीधरच्या लोकांनी पराभव केला ते भाजपला खूप झोंबलंय; अजितदादांची तुफान टोलेबाजी

Published On: 

मुंबई : राज्य विधिमंडळाच्या दोन दिवसीय हिवाळी अधिवेशनाला कालपासून सुरुवात झाली आहे. कालपासून सुरु झालेल्या या अधिवेशनात विरोधक चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसून आले होते. विरोधकांचा हा बाणा आजही कायम असल्याचं दिसून येत आहे. विरोधकांनी हे अधिवेशन सुरु होण्याआधीच सरकारला घेरण्यासाठी मोर्चेबांधणी केल्याचं दिसून आलं होतं.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि चंद्रकांत पाटील यांनी सरकार जोरदार हल्लाबोल केला. मेट्रो कारशेड, आरे, सारथी, मराठा आरक्षण, अभिनेत्री कंगना रानौत, पत्रकार अर्णब गोस्वामी यांची अटक यासह अनेक मुद्द्यांवरून सरकारच्या कारभारावर टीकास्त्र या नेत्यांनी सोडलेलं दिसलं.

दरम्यान, विरोधकांच्या प्रश्नांवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जोरदार उत्तर दिलं आहे. ‘तीन पक्षांचं सरकार आल्याने हातातोंडाचा घास गेल्याने विरोधकांना दुःख झालं आहे. आता विधानपरिषदेच्या निवडणुकीत दावे करत होते. आमच्या पाच येतील सत्ताधाऱ्यांची एक येईल, पण निकाल वेगळे लागले. नागपूरची जागा तर किती वर्षांनी पराभूत झाले. पदवीधरच्या लोकांनी पराभव केला ते खूप झोंबलं आहे. तर, नागपूरमध्ये पराभव झाल्याने भाजप मधल्याच एका गटाला खूप उकळ्या फुटतायत.’ असा टोला देखील पवारांनी लगावला आहे.

भाजपात गेलेलं ‘ते’ नेते कधी राजीनामा देतील आणि आमच्यात येतील सांगता येत नाही – पवार

‘पदवीधर-शिक्षक निवडणुकांमध्ये या भाजपचा जोरदार प्रभाव झाला असून आता माझं त्यांना सांगणं आहे, जे राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेनेतून भाजपात गेले आहेत, त्यांच्याकडे लक्ष द्या. कधी एक-एक जण राजीनामा देईल आणि निवडून इकडून येतील हे सांगता येत नाही’ असं सूचक विधान करून अजित पवार यांनी भाजपमध्ये गेलेले नेते घरवापसी करतील असे सूतोवाच दिले आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!