मुंबई : राज्य विधिमंडळाच्या दोन दिवसीय हिवाळी अधिवेशनाला कालपासून सुरुवात झाली आहे. कालपासून सुरु झालेल्या या अधिवेशनात विरोधक चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसून आले होते. विरोधकांचा हा बाणा आजही कायम असल्याचं दिसून येत आहे. विरोधकांनी हे अधिवेशन सुरु होण्याआधीच सरकारला घेरण्यासाठी मोर्चेबांधणी केल्याचं दिसून आलं होतं. जनतेच्या प्रश्नासाठी २ दिवसांचं अधिवेशन पुरेसं नाही त्यामुळे हे या अधिवेशनाचा कालावधी वाढवावा अशी मागणी केली जात होती. यावर खुद्द विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी देखील अधिवेशन कालावधीवर नाराजी व्यक्त केली होती.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि चंद्रकांत पाटील यांनी सरकार जोरदार हल्लाबोल केला. मेट्रो कारशेड, आरे, सारथी, मराठा आरक्षण, अभिनेत्री कंगना रानौत, पत्रकार अर्णब गोस्वामी यांची अटक यासह अनेक मुद्द्यांवरून सरकारच्या कारभारावर टीकास्त्र या नेत्यांनी सोडलेलं दिसलं.
दरम्यान, विरोधकांच्या प्रश्नांवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पाठोपाठ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उत्तर देण्यास सुरुवात केली. त्यांनी मराठा आरक्षणावरून मराठा समाजासह सर्वच समाजांना न्याय देण्याचं आश्वासन दिलं आहे. मराठा समाजाला आरक्षण देताना त्यांना इतर समाजाच्या कोट्यातून आरक्षण दिल जाईल अशी कुजबुज पसरल्यानंतर ओबीसी समाज देखील आक्रमक झालेला पाहायला मिळाला.
यावर उद्धव ठाकरे यांनी चोख उत्तर उत्तर दिलं आहे. ‘मराठा समाजाला आरक्षण देताना इतर समाजाचं आरक्षण कमी करणार का? ओबीसी समाजाचं आरक्षण कमी करणार का? दुसऱ्या समाजाच्या आरक्षणात घुसवणार का? असे प्रश्न केले जात आहेत. आज मी या सभागृहात अत्यंत जबाबदारीने ठामपणे सांगतो, मराठा समाजाला न्याय, हक्क मिळवून देताना दुसऱ्या समाजाचं एक कणही काही काढून घेणार नाही, रेकॉर्डवर घ्या’ असं स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- चंद्रकांत पाटलांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा; भाजप पदाधिकाऱ्यांची मागणी
- ‘ते’ बंगले खाजगी प्रॉपर्टी नाहीत, झालेल्या खर्चात काही गैर नाही – अशोक चव्हाण
- अहमद पटेल यांचे सत्तेत असूनही सत्तेतील पदांमध्ये त्यांचे मन कधीच रमले नाही : शरद पवार
- भाजपात गेलेलं ‘ते’ नेते कधी राजीनामा देतील आणि आमच्यात येतील सांगता येत नाही – पवार
- शेतकऱ्यांची माफी मागणार का? असा प्रश्न विचारताच दानवेंनी काढला पळ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
