औरंगाबाद:- दिल्लीतील शेतकऱ्यांचे आंदोलन नसून या आंदोलनामागे चीन आणि पाकिस्तानचा हात असल्याचे वादग्रस्त विधान भाजपचे नेते आणि केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठा राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केले होते. हे आंदोलन बाहेरच्या देशाचे षडयंत्र असून आपल्या देशातील लोकांनी याचा विचार केला पाहिजे, असेही दानवे म्हणाले.
आंदोलन करणारे लोक हे सुटाबुटातील लोक आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शेतकऱ्यांचे पंतप्रधान आहेत. त्यामुळे कोणाच्या भूल थापांना बळी पडू नका, असे आवाहन देखील दानवे यांनी केले आहे. या वक्तव्यांमुळे दानवे यांच्यावर चौफेर टीका होत आहे.
भाजपचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर आज रावसाहेब दानवे यांनी औरंगाबादमध्ये पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी ‘शेतकऱ्यांच्या आंदोलनामागे चीन आणि पाकिस्तानचा हात आहे’, असं तुम्ही म्हणाला होता, याबद्दल दानवे यांना विचारले असता दानवे यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. ‘मुळात मी हाडाचा शेतकरी आहे. कागदावरचा शेतकरी नाही. मी जनावरं आपल्या हाताने धुतले आहेत. माझ्या बोलण्याचा विपर्यास करण्यात आलेला आहे’ असं दानवे म्हणाले. त्यानंतर पत्रकारांनी तुम्ही शेतकऱ्यांची माफी मागणार का असा प्रश्न विचारता दानवे पत्रकार परिषदेमधून उठून निगून गेले.
महत्वाच्या बातम्या
- चंद्रकांत पाटलांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा; भाजप पदाधिकाऱ्यांची मागणी
- ‘ते’ बंगले खाजगी प्रॉपर्टी नाहीत, झालेल्या खर्चात काही गैर नाही – अशोक चव्हाण
- अहमद पटेल यांचे सत्तेत असूनही सत्तेतील पदांमध्ये त्यांचे मन कधीच रमले नाही : शरद पवार
- निवडणुकीनंतर सरपंचपदाची आरक्षण सोडत काढण्याचा निर्णय राजकीय हेतूने- दरेकर
- सत्तेची हवा डोक्यात जाता कामा नये; देवेंद्र फडणवीस यांचा ठाकरेंना टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

