बीड : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी परळी नगर परिषदेच्या सभापती निवडीमध्ये महाविकास आघाडीचा धर्म पाळला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता असूनही शिवसेनेच्या एकमात्र नगरसेविकेस सभापती पद दिले आहे. परळी नगरपरिषदेच्या विषय समित्यांची आज फेरनिवड संपन्न झाली आहे. या फेरनिवडीमध्ये धनंजय मुंडे महाविकास आघाडीच्या धर्माचे पालन केले आहे.
परळी नगरपरिषदेत एकूण ३२ निवडून आलेले तर ३ स्वीकृत असे एकूण ३५ नगरसेवक आहेत. यापैकी जवळपास ३० नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहेत. तर गंगासागर शिंदे या एकमेव शिवसेनेच्या नगरसेविका आहेत. विषय समित्यांच्या फेरनिवडणुकीमध्ये शिवसेनेच्या एकमात्र नगरसेविका गंगासागर बाबुराव शिंदे यांना महिला व बालविकास सभापती पद देण्यात आले.
एकीकडे आपल्यावर झालेल्या आरोपांचा सामना करत असताना धनंजय मुंडे यांनी परळी मतदारसंघात ग्रामपंचायत निवडणुकीत एकेरी वर्चस्व मिळवले होते. त्यापाठोपाठ आता नगर परिषद विषय समित्यांच्या निवडीमध्ये महाविकास आघाडीचा धर्म पाळून व सर्व धर्मियांना सोबत घेऊन समान न्याय देण्याची भूमिका बजावली आहे.
दरम्यान, आज धनंजय मुंडेंना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांच्यावर गंभीर आरोप करणाऱ्या रेणू शर्मा यांनी मुंडेविरोधातील तक्रार मागे घेतली आहे. कौटुंबिक कारणास्तव मी तक्रार मागे घेत आहे, असं रेणू शर्मा यांनी तक्रार मागे घेताना सांगितलं. याबाबत तिने पोलिसांना लेखी लिहून दिलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘बहुजन समाजातून आलेल्या धनंजय मुंडेंना भयंकर त्रास झाला, त्याला वाली कोण ?’
- आरटीई प्रवेशाचे संभाव्य वेळापत्रक जाहिर
- ‘चलो बुलावा आया है’ प्रसिद्ध भजन गाणारे भजन सम्राट नरेंद्र चंचल यांचं निधन
- काँग्रेस स्वबळावर महाराष्ट्रात सत्तेत कसा येईल यासाठी प्रयत्न करणार : नाना पटोले
- पुणेकरांसाठी महत्वाची बातमी : चारचाकीतून प्रवास करताना आता मास्कची गरज नाही ! मात्र…


