परभणी: जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढत आहे, त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून रुग्णांसाठी कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीमध्ये ऑक्सिजन सिलिंडर सुविधा असलेले ५० खाटांच्या कोविड सेंटरला मंजुरी मिळाली आहे. लवकरच हे सेंटर सुरु करण्यात येणार असल्याची माहिती खा.हेमंत पाटील यांनी दिली. सोबतच याठिकाणी स्वतंत्र विद्युत, पाण्याची व्यवस्था आणि लागणाऱ्या अत्यावश्यक सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
महाराष्ट्रसह संपूर्ण जगभर कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढला असून प्रतिबंधासाठी आरोग्य, जिल्हा प्रशासन यांच्यासह पोलीस प्रशासन सुद्धा युद्ध पातळीवर काम करीत आहे. ग्रामीण भागात सुद्धा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. यामुळे शहरी,तसेच ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा येथे मागील काही दिवसांपासून कोरोनाचे संक्रमण वाढले असून याठिकाणी कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने खा.हेमंत पाटील यांनी तातडीने डोंगरकडा येथे भेट देऊन प्राथमिक आरोग्य केंद्राची पाहणी केली.
याठिकाणी कोविड सेंटरला मंजुरी मिळाली असून लवकरच कोविड सेंटर उभारण्यात येणार असल्याचे खा. हेमंत पाटील म्हणाले. संबंधित अधिकाऱ्यांना याठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश त्यांनी दिले. डोंगरकडा प्राथमिक आरोग्य केंद्राला जोडून जवळपास ५० गावे असल्याने याठिकाणी नागरिकांना सर्व सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजेत. सुविधांअभावी नागरिकांना नांदेड, हिंगोली किंवा कळमनुरी या ठिकाणी जावे लागत असल्याने नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
महत्वाच्या बातम्या
- उस्मानाबादेत कोरोना लसीकरणसाठी आजपासून नवे ६० केंद्र
- संपूर्ण लॉकडाऊनचा निर्णय घेतला नाहीतर आम्हीही दुकाने उघडणार,व्यापाऱ्यांचा प्रशासनाला इशारा
- आज रंगणार मुंबईविरुद्ध कोलकाता ; मुंबईसमोर मोठे आव्हान
- देवेंद्रजींबद्दल आता काय बोलणार…, मी पुन्हा येणार म्हणता-म्हणता ते आलेच नाहीत – बाळासाहेब थोरात
- दुसऱ्या सामन्याआधी मुंबई इंडियन्सच्या संघासाठी आनंदाची बातमी

