Share

संजु जैसा कोई नही; या सत्रातील पहिल्या शतकासह अनोख्या विक्रमाला गवसणी

Published On: 

मुंबई : सोमवारी झालेल्या आयपीएलच्या सामन्यात पंजाब किंग्स संघाने राजस्थान रॉयल्सचा ४ धावांनी पराभव केला. विजय जरी पंजाब संघाने मिळवला असला तरी सगळीकडे चर्चा मात्र फक्त राजस्थानच्या संघाचा कर्णधार संजु सॅमसनच्या शतकी खेळीची होती. या सामन्यात संजु सॅमसनने ६३ चेंडुत ११९ धावा केल्या.

सामन्यात जरी पराभव स्विकारावा लागला तरी संजु सॅमसनने एका अनोख्या विक्रमाला गवसणी घातली आहे. आयपीएलच्या आजपर्यंतच्या इतिहासात कर्णधार म्हणून पहिल्याच सामन्यात शतक करणारा पहिला खेळाडू ठरला आहे. तसेच कर्णधार म्हणून पदार्पणात सर्वाधिक धावांचा श्रेयस अय्यरचा विक्रमही संजु सॅमसनने मोडीत काढला. श्रेयस अय्यरने पदार्पणात २०१८ च्या मोसमात ९३ धावा केल्या होत्या.

आयपीएलमधील संजूचे हे तिसरे शतक ठरले. भारताकडून आयपीएलमध्ये सर्वाधिक शतक करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विराट कोहलीनंतर संजूचा क्रमांक लागतो. विराटने पाच शतक केली आहेत. कर्णधार म्हणून संजु सॅमसनचा हा पहिलाच सामना होता. पंजाब किंग्सने दिलेल्या २२२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना संजुने लक्ष्य जवळपास गाठलेच होते. मात्र आखेरच्या चेंडुवर विजयासाठी ६ धावांची गरज असताना तो झेलबाद झाला.

महत्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!